By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
आंतरराष्ट्रीयताज्या बातम्याम्युच्युअल फंडलेटेस्ट न्यूजशेअर बाजारशेअर मार्केटस्टर मनी विश्लेषण

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

admin
Last updated: 2026/01/20 at 11:06 AM
admin Published January 20, 2026
Share
SHARE

गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय ठरला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीच्या दराने पहिल्यांदाच 3,18,000 रुपये प्रति किलोचा आकडा ओलांडला आहे. दुपारी दीड दीड वाजण्याच्या सुमारास चांदीने 3,18,500 रुपयांचा उच्चांक गाठला.

गेल्या फक्त एका वर्षात चांदीच्या किमतीत तब्बल 210 टक्क्यांची वाढ झाली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय देशांना एक इशारा दिला आहे. ‘ग्रीनलँड’ संदर्भात जर जूनपर्यंत करार झाला नाही, तर युरोपीय देशांवर २५ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर लावला जाईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली. या राजकीय तणावामुळे जगभरातील गुंतवणूकदार घाबरले असून त्यांनी आपले पैसे सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्या-चांदीत वळवले आहेत.

चीनमध्ये चांदीची मागणी इतकी वाढली आहे की, तिथे चांदीचा भाव लंडनच्या बाजारपेठेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. चीनमध्ये चांदीचा साठा कमी होत चालला असून औद्योगिक वापरासाठी तिथले व्यापारी मोठ्या प्रमाणावर चांदी खरेदी करत आहेत.

चांदी ही आता फक्त दागिने बनवण्यासाठी उरलेली नाही. सोलर पॅनेल, इलेक्ट्रिक गाड्या आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये चांदीचा वापर अनिवार्य आहे. जगभरात ‘ग्रीन एनर्जी’चे महत्त्व वाढत असल्याने चांदीची मागणी सतत वाढत आहे, पण त्या तुलनेत खाणींमधून होणारा पुरवठा कमी पडत आहे. तज्ज्ञांच्या मते, ज्यांनी कमी दरात चांदी घेतली होती, त्यांनी आता थोडा नफा पदरात पाडून घेण्याची ही चांगली वेळ आहे.

चांदी आता विक्रमी उच्चांकावर आहे, त्यामुळे आता एकदम मोठी रक्कम गुंतवणे जोखमीचे ठरू शकते. जर तुम्हाला दीर्घकाळासाठी किमान 5 ते 10 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल, तर जेव्हा कधी दर थोडे खाली येतील 2.85 ते 2.90 लाखांच्या आसपास, तेव्हा थोड्या-थोड्या प्रमाणात चांदी खरेदी करणे फायद्याचे ठरेल. मात्र तुम्ही आता जर चांदीतला नफा काढला नाहीत आणि चांदीचे दर पडले तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं असा दावा काही तज्ज्ञांचा आहे.

काही तज्ज्ञांच्या मते, ही दरवाढ इथेच थांबणार नाही. जर जागतिक परिस्थिती अशीच राहिली, तर चांदी 3,40,000 ते 4,00,000 रुपयांपर्यंत देखील मजल मारू शकते. मात्र, सध्या बाजार खूप अस्थिर असल्याने गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यामुळे चांदी विकायची की नाही ते तुम्ही स्वत: जोखीम घेऊन ठरवा किंवा तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कोणत्याही नफ्या तोट्यासाठी न्यूज स्टार मनी मराठी जबाबदार राहणार नाही.

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर…

मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली सर्वात मोठी ऑफर, रशियावर होणार थेट परिणाम…

TAGGED: America - अमेरिका, Donald Trump / डोनाल्ड ट्रम्प, Silver / चांदी, United States / अमेरिका, United States News, शेअर मार्केट
admin January 20, 2026 January 20, 2026
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
लेटेस्ट न्यूज

Video : मेडिकल कॉलेजवर कोसळलं विमान; जेवतानाचं विद्यार्थांवर काळाचा घाला, अनेकांचा मृत्यू …

admin admin June 12, 2025
अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणारं खैरलांजी हत्याकांड; नेमकं काय घडलं होतं?
Business Casual: The Definitive Guide for Women To Be Stylish At Work
‘लॉजच्या रुममध्ये घुसून.’; राष्ट्रवादीच्या नेत्याचं भयानक कांड, नेमक घडल काय ?
शेअर बाजारातही चीन ठरतोय भारताला डोकेदुखी ? जाणून घ्या भारतीय शेअर बाजार घसरणीचे नेमके कारण ?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?