By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली सर्वात मोठी ऑफर, रशियावर होणार थेट परिणाम…
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
ताज्या बातम्याराजकीयराष्ट्रीयलेटेस्ट न्यूज

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली सर्वात मोठी ऑफर, रशियावर होणार थेट परिणाम…

admin
Last updated: 2026/01/11 at 2:34 AM
admin Published January 11, 2026
Share
SHARE

जागतिक स्तरावर घडामोडींना वेग आला आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलावर कब्जा केला आहे. आता पुढील काही काळ या देशावर अमेरिकेचे वर्चस्व असणार आहे. गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिकेमधील संबंध थोडे ताणलेले आहेत.

कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लादला आहे. यातील 25 टक्के कर हा रशियन तेलाची खरेदी करत असल्यामुळे लावण्यात आलेला आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराबाबतही चर्चा सुरू आहे. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला सर्वात मोठी ऑफर दिली आहे. याचा भारताला फायदा होऊ शकतो, पण रशियाला फटका बसण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमेरिकेला भारताला तेल खरेदीची ऑफर

अमेरिकेने कब्जा केलेल्या व्हेनेझुएला देशात तेलाचे मोठे साठे आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला रशियाऐवजी व्हेनेझुएलाकडून कच्चे तेल खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. मात्र यावर पूर्णपणे अमेरिकेचे नियंत्रण असणार आहे. व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे की, भारताला व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी दिली जाऊ शकते, मात्र यासाठी अटी काय असतील याबाबत निर्णय अंतिम झालेला नाही. आता भारताने ही ऑफर स्वीकारली तर रशियावर थेट परिणाम होऊ शकतो. कारण भारत रशियाकडून तेल आयात करत असल्यामुळे रशियन अर्थव्यवस्थेला आधार मिळत आहे, मात्र भारताने तेल खरेदी बंद केल्यास पुतीन यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जगाचे लक्ष भारताकडे लागले आहेत.

अमेरिकेची अट काय?

अमेरिकन सरकारने म्हटले आहे की, व्हेनेझुएलाचे तेल बाजारात परत येऊ शकते, मात्र व्हेनेझुएला ते थेट विकू शकणार नाही. अमेरिकेचे ऊर्जा सचिव क्रिस्टोफर राईट यांनी म्हटले की, ‘व्हेनेझुएलाचे तेल अमेरिकेच्या देखरेखीखाली विकले जाईल आणि त्यातून मिळणारे उत्पन्न अमेरिकेद्वारे नियंत्रित केले जाईल. याचा अर्थ असा की, तेल जरी व्हेनेझुएलाचे असले तरी अमेरिका त्याच्या किंमती, खरेदीदार आणि वित्तपुरवठ्यावर नियंत्रण ठेवेल.

भारतासाठी व्हेनेझुएलाचे तेल का महत्त्वाचे ?

अमेरिकेच्या निर्बंधांपूर्वी, भारत व्हेनेझुएलाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत होता. व्हेनेझुएलाचे जड कच्चे तेल भारताच्या जटिल रिफायनरीजसाठी अत्यंत योग्य मानले जाते. त्यामुळे भारताने तेल खरेदीला सुरूवात केली तर भारताला आपल्या ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्यास मदत होऊ शकते. यामुळे भारताला मोठा दिलासा मिळू शकतो. आता अमेरिकेच्या ऑफरवर भारत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर…

मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…

admin January 11, 2026 January 11, 2026
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
क्राईमधार्मिकमहाराष्ट्रलेटेस्ट न्यूज

बीडमध्ये संतापजनक घटना! ‘लक्ष्मी देवी’ मूर्तीची विटंबना; दगडाने मूर्तींची तोडफोड, अज्ञात आरोपी मोकाट!

admin admin October 13, 2025
मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदेंच्या खात्याचे 3 धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार …
खुल्लम खुल्ला प्यार करेंगे.. 55 वर्षांच्या दाजीशी 18 वर्षांच्या मेहुणीचे लग्न, तरुणी म्हणते- म्हातारा नाही, सुंदर आहे पती!
दिवसभराच्या चढ-उतारानंतर सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट बंद; बँक निफ्टीत मोठी वाढ; कोणते शेअर्स चमकले?
वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवणार? वाद पेटलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा …
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?