By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: धनंजय मुंडेंवर कारवाई कधी होणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले …
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > राजकीय > धनंजय मुंडेंवर कारवाई कधी होणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले …
राजकीय

धनंजय मुंडेंवर कारवाई कधी होणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले …

admin
Last updated: 2025/01/29 at 1:02 AM
admin Published January 29, 2025
Share
SHARE

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damani) यांनी सोमवारी अजित पवार यांची भेट घेत ही मागणी केली.

“अंजली दमानिया यांनी काही कागदपत्रं माझ्याकडे दिली, ती मी पाहिली. मी आज कॅबिनेट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटणार होतो. फोनवरुन आमचं बोलणं झालं होतं, समोरासमोर बोलणं झालं होतं. आज ते नागपूरला जाणार होते. त्यांनी मला चेंबरमध्ये बोलावून भेटूया असं सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की, अंजली दमानिया मलाही भेटल्या असून काही कागदपत्रं दिली आहेत. त्यांनी सांगितलं की, एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन अशा तीन चौकशा सुरु आहेत. हे पुरावे एसआयटी, सीआयडीकडे दिले आहेत. त्याबद्दलची वस्तुस्थिती काय पुढे येते त्यानुसार निर्णय घेतला जाईल,” असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

 

“जी काही घटना बीडमध्ये घडली आहे, त्यासंबंधी चौकशी सुरु आहे. चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तशा पद्धतीने प्रयत्न सुरु आहेत. आणखी काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. पण जर कोणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही. पण जर संबंध असेल तर निश्चित कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही. हीच भूमिका मुख्यमंत्र्यांसह आमची आहे,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. माझ्यावेळी जे काही झालं होतं ते असह्य झाल्यामुळे राजीनामा दिला होता. चौकशी सुरु असून, दोषी आढळलं तर त्यांना पाठीशी घातलं जाणार नाही असंही ते म्हणाले.

“सुरेश धसला काय वाटतं त्याच्या मला काही देणंघेणं नाही. मी सरकारमध्ये भाजपाबरोबर आहे. मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतो. त्यांच्याशी चर्चा करुन महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढे काम करावं असा प्रयत्न असतो. एकनाथ शिंदेंची यात महत्त्वाची भूमिका आहे. निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसून निर्णय़ घेतो. जर वेगवेगळ्या पक्षातील खालचे कार्यकर्ते बोलू लागले तर त्याला काही अंतच उरणार नाही. जी काही भूमिका असेल तर अमित शाह, देवेंद्र फडणवीस, जे पी नड्डा, चंद्रशेखर बावनकुळे सांगतील,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

 

“मी उद्या रात्री संभाजीनगर आणि तिथून बीडला जाणार आहे. अर्धा दिवस बीडला आहे. तेथील पालक सचिव वाघमारे यांनाही येण्याची सूचना केली आहे. संध्याकाळी पुण्यात बैठकीसाठी येणार आहे,” अशी माहिती अजित पवारांनी दिली. नाना पटोले यांनी आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे की नाही याबाबत फुकट सल्ला देऊ नये असंही ते म्हणाले आहेत.

मी वरिष्ठ पातळीवर सर्वांच्या संपर्कात आहे. खालचे लोक काय बोलतात यावर उत्तर देण्यास बांधील नाही असं त्यांनी सांगितलं आहे. कोणाला पाठीशी घालणार नाही. अख्ख्या महाराष्ट्राला माझा स्वभाव आणि कामाची पद्धत माहिती आहे असंही ते म्हणाले.

You Might Also Like

Video : मनोहर धाकडने त्या रात्री हायवेर Se* केल्यानंतर पुढे काय केलं?

भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद …

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; ठाकरेंसाठी सगळ्यांना भिडणाऱ्या सुषमा अंधारेंना मोठी जबाबदारी …

‘धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत लग्न केलंच नाही, वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय झालं?

वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवणार? वाद पेटलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा …

admin January 29, 2025 January 29, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
क्राईम

स्वयंपाक करत असताना नवऱ्यासह सासरच्यांनी तिला जाळून मारलं

admin admin February 13, 2025
Hello world!
आदित्य ठाकरे किती कोटींचे मालक? गाड्या किती आणि दागिने किती? वाचा सविस्तर
त्या रात्री नेमकं काय घडलं? महालामधून अचानक 250 लोक एकाएकी गायब झाले, 300 वर्षांनंतर कॅमेऱ्यात कैद झाला भयानक व्हिडीओ
उर्जा कंपनीला मिळाली 765 कोटींची ऑर्डर, शेअर्सने घेतली उसळी!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?