By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: तळेगावच्या शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसा वक्फ बोर्डाकडून गेलेल्या नाहीत- अध्यक्ष समीर काजी
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > महाराष्ट्र > तळेगावच्या शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसा वक्फ बोर्डाकडून गेलेल्या नाहीत- अध्यक्ष समीर काजी
महाराष्ट्र

तळेगावच्या शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसा वक्फ बोर्डाकडून गेलेल्या नाहीत- अध्यक्ष समीर काजी

admin
Last updated: 2024/12/09 at 2:36 PM
admin Published December 9, 2024
Share
SHARE

लातूर : (अहमदपूर ) राज्य शासनाच्या वक्फ न्यायाधिकरणात याचिकाकर्ते पटेल सय्यद इरफान यांच्या अर्जावरून अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील जवळपास १०३ शेतकरी व महाराष्ट्र शासन यांना ३० मे रोजी नोटिसा बजावण्यात आल्या.

एकाचवेळी शंभरावर शेतकऱ्यांना नोटिसा आल्याने अनेकांनी वकिलांमार्फत आपले म्हणणे सादर केले. यावर आता २० डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, तळेगावच्या शेतकऱ्यांना पाठविलेल्या नोटीशीसी वक्फ बोर्डाचा संबंध नसल्याचे रविवारी बाेर्डाने स्पष्ट केले आहे.

 

तळेगावच्या जमिनीवर महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण औरंगाबादच्या न्यायालयाने याचिका क्र . १७/ २०२४ अन्वये हा दावा केला आहे. त्याचप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांना ३० मे २०२४ रोजी बजावण्यात आलेल्या नोटिसीमध्ये, वक्फ न्यायाधिकरणात वैयक्तिकरीत्या किंवा प्लीडरद्वारे अपीलाशी संबंधित सर्व भौतिक प्रश्नांची उत्तरे देण्याबाबत समन्स बजावण्यात आले आहे. न्यायाधिकरणास उत्तर देण्यास सक्षम असलेली एखादी व्यक्ती असेल, दाव्याचे उत्तर आणि हजेरीसाठी निश्चित केलेले मुद्दे निकाली काढण्यासाठी, अपीलच्या अंतिम निकालासाठी नियुक्त केले गेले आहे, त्या दिवशी तुम्ही सर्व साक्षीदार आणि कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे, असे नमूद केले. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी वक्फ न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे. अनेकांनी वकिलांमार्फत आपले म्हणणे सादर केले आहे.

 

तीन पिढ्यांपासून जमीन कसतो…

माझी पाच एकर जमीन आहे. आमच्या तीन पिढ्यांपासून आम्ही ही जमीन कसतो. आमच्याकडे खासरा पानी नक्कल, सात-बारा आदी पुरावे आहेत. २० डिसेंबर रोजी औरंगाबाद वक्फ न्यायाधिकरणाकडे हे पुरावे वकिलांमार्फत सादर करणार आहोत. एकाचवेळी गावातील १०३ शेतकऱ्यांना नोटिसा आल्यामुळे शेतकरी घाबरले आहेत. – तुकाराम कानवटे, शेतकरी, तळेगाव.

 

शासनाकडून शपथपत्र दाखल केले जाईल…
तळेगाव येथील १०३ शेतकऱ्यांच्या जवळपास ३०० एकर जमिन प्रकरणी शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधीकरणाच्या नोटीसा आल्या आहेत. याची संपूर्ण माहिती घेऊन शासनातर्फे शपथपत्र दाखल करण्यात येणार आहे. -उज्जवला पांगरकर, तहसीलदार, अहमदपूर.

 

राज्य वक्फ बोर्डाचा संबंध नाही…
तळेगाव येथील शेतकऱ्यांना पाठविलेल्या नोटिसा एका व्यक्तीने वक्फ ट्रिबुनल कोर्टात दावा दाखल केल्यानंतर कोर्टाने काढल्या आहेत. त्या नोटीसा वक्फ बोर्डाकडून गेलेल्या नाहीत. आम्ही लातूर जिल्ह्यातील कुठल्याही गावच्या जमीनीवर दावा केलेला नाही. – समीर काजी, अध्यक्ष, वक्फ बोर्ड, महाराष्ट्र राज्य.

You Might Also Like

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; ठाकरेंसाठी सगळ्यांना भिडणाऱ्या सुषमा अंधारेंना मोठी जबाबदारी …

‘तो’ फोन आला अन् डोक्यात गोळी झाडली,आत्महत्येचा प्रयत्न का केला?

वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवणार? वाद पेटलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा …

शिंदे साहेब तारीख-वेळ सांगा, किती मावळे, जेसीबी पाहिजे ते सांगा, भाषणबाजी नको ….

‘तुमच्या परिसरातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर…’; अजित पवारांच्या घोषणेने वाढले मद्यविक्रेत्यांचे टेन्शन!

admin December 9, 2024 December 9, 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News

Hello world!

admin admin October 19, 2024
Business Casual: The Definitive Guide for Women To Be Stylish At Work
महाकुंभ मेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाने 10 दिवसांत 10 कोटी कमावले?, सत्य काय ?
Video : पाकिस्तानच्या कुरापती थांबेना, जम्मूत ड्रोन हल्ला, भारताकडून चोख प्रत्युत्तर …
Video : कॉन्स्टेबलने पत्नीला वकिलासोबत रंगेहाथ पकडले…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?