By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: शेअर मार्केटमध्ये आज मुहूर्ताचं ट्रेडिंग, खरेदीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे ५ शेअर
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
टेक-गॅजेटलेटेस्ट न्यूजशेअर मार्केट

शेअर मार्केटमध्ये आज मुहूर्ताचं ट्रेडिंग, खरेदीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे ५ शेअर

admin
Last updated: 2024/11/01 at 12:22 PM
admin Published November 1, 2024
Share
SHARE

शेअर बाजार आज बंद असला तरी दरवर्षीप्रमाणे आज संध्याकाळी मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. त्यासाठी सहा ते सात वाजेच्या दरम्यान एक तास बाजार सुरू राहणार असून या वेळेत शेअर्सचे व्यवहार करता येणार आहेत.

 

या खास मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी मार्केट एक्सपर्ट्सनी पाच खास स्टॉक्स सुचवले आहेत.

चॉइस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमित बागडिया आणि आनंद राठीचे गणेश डोंगरे यांनी गुंतवणूकदारांसाठी काही शेअर्सची शिफारस केली आहे. त्यात क्रिसिल, फोर्टिस हेल्थकेअर, नॅटको फार्मा, चंबल फर्टिलायझर्स आणि सन फार्मा या शेअर्सचा समावेश आहे.

 

सुमीत बागडिया यांचा सल्ला

क्रिसिल : हा शेअर५४७४.७५ रुपयांवर खरेदी करा. ५८५० रुपयांचे टार्गेट ठेवताना ५२८० रुपयांवर स्टॉप लॉस लावायला विसरू नका. क्रिसिलचा दैनंदिन चार्ट पुढील आठवड्यात सातत्यपूर्ण वाढीचा संकेत देत आहे, असं बागडिया यांनी म्हटलं आहे.

फोर्टिस हेल्थकेअर : ६६५ रुपयांचं टार्गेट ठेवून हा शेअर ६२४.७० रुपयांना खरेदी करा. खरेदी करताना ६०० रुपयांचा स्टॉपलॉस लावायला विसरू नका. फोर्टिसचे शेअर्स सध्या ६४२.७ रुपयांवर आहेत आणि जोरदार तेजी दाखवत आहेत. हा शेअर आणखी वरच्या दिशेनं जाण्याची शक्यता आहे. अल्प मुदतीत हा शेअर चांगला नफा देऊ शकतो.

 

गणेश डोंगरे यांची शिफारस

नॅटको फार्मा : नॅटको फार्मा १४५० रुपयांच्या टार्गेटसह १४०२ रुपयांना खरेदी करा. स्टॉपलॉस १३६५ रुपये ठेवायला विसरू नका. नॅटकोला १३६५ वर पुरेसा सपोर्ट आहे. सध्या १४०२ रुपयांवर असलेल्या या शेअरनं किमतींमध्ये बरेच चढउतार दाखवले आहेत. वाढीचा वेग कायम ठेवण्याची या शेअरची क्षमता आहे. हा स्टॉक खरेदी करून होल्ड करता येईल.

 

चंबल फर्टिलायझर्स : हा शेअर४८४ रुपयांना खरेदी करा, ४९८ रुपयांचे टार्गेट ठेवा आणि ४७५ रुपयांवर स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका. तांत्रिक पॅटर्ननुसार शेअरच्या किमतीत तात्पुरती घसरण होण्याची शक्यता आहे. मात्र, नंतर तो ४९८ रुपयांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे.

 

सन फार्मा : सन फार्मा १८५८ रुपयांवर खरेदी करून १९०० रुपयांचं टार्गेट ठेवा. १८४० रुपयांचा स्टॉप लॉस लावायला विसरू नका. दैनंदिन चार्टवर १८५८ च्या पातळीवर ब्रेकआऊट दिसून आला आहे, जो संभाव्य वाढीचा कल दर्शवितो. या ब्रेकआऊटला सामोरे जाताना रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (आरएसआय) अजूनही वाढत असून, खरेदीचा वेग वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. हे तांत्रिक निर्देशांक लक्षात घेता, डिप्सवर खरेदी करण्याचा विचार केला जाऊ शकतो.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. यातील तज्ज्ञांची मते त्यांची वैयक्तिक आहेत, हिंदुस्तान टाइम्स मराठीची नाहीत. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर…

मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…

admin November 1, 2024 November 1, 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
स्टर मनी विश्लेषण

बाबा रामदेव यांची दिनचर्या,आजही काळेभोर आहेत केस, बाबा रामदेव खातात 3 भाजी, शेकडो आजारांचा मुळासकट होईल नायनाट

admin admin January 13, 2025
चालत्या गाडीत पत्नीला दुसऱ्यासोबत पाहिल्यावर पती झोपला बोनेटवर अन …
चेंगराचेंगरीनंतर महाकुंभमेळ्यात पुन्हा भीषण आग! अनेक तंबू आगीच्या भक्षस्थानी, घटनेनं खळबळ
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले…
Share Market : शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’! सेन्सेक्स 900 अंकांनी कोसळला; निफ्टी 24,000च्या खाली
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?