By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: बाबा रामदेव यांच्या पतंजलीने जाहीर केला लाभांश; प्रत्येक शेअरवर मिळणार आठ रुपये!
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
लेटेस्ट न्यूज

बाबा रामदेव यांच्या पतंजलीने जाहीर केला लाभांश; प्रत्येक शेअरवर मिळणार आठ रुपये!

admin
Last updated: 2024/10/29 at 12:44 AM
admin Published October 29, 2024
Share
SHARE

बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील कंपनी पतंजली फूड्स लिमिटेडने आपल्या भागधारकांना लाभांश जाहीर केला आहे.

सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करताना कंपनीने सांगितले की ती तिच्या भागधारकांना प्रति शेअर 8 रुपये अंतरिम लाभांश देईल. कंपनीने यासाठी 4 नोव्हेंबर 2024 ही रेकाॅर्ड तारीखही निश्चित केली आहे.

लाभांश इतिहास

पतंजली फूड्स लिमिटेडने यापूर्वी आर्थिक वर्ष 2024 मध्ये आपल्या भागधारकांना दोनदा लाभांश देण्याची घोषणा केली होती. यापूर्वी कंपनीने 21 सप्टेंबर 2023 रोजी 6 रुपये लाभांश दिला होता. त्यानंतर 21 मार्च 2024 रोजी 6 रुपये लाभांश दिला. अशा प्रकारे आर्थिक वर्ष 2024 मध्ये प्रत्येक शेअरवर एकूण 12 रुपये लाभांश दिला. पतंजली फूड्सने 14 ऑगस्ट 2001 पासून एकूण 19 वेळा लाभांश दिला आहे. सध्या त्याचा लाभांश उत्पन्न 0.36 टक्के आहे.

सप्टेंबर तिमाहीचे निकाल

पतंजली फूड्सने गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी आर्थिक वर्ष 2025 च्या सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीने म्हटले की सप्टेंबरच्या तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा 21.4 टक्क्यांनी वाढून 309 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 254.5 कोटी रुपये होता. या कालावधीत कंपनीचा महसूल 4.2 टक्क्यांनी वाढून 8,154.2 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत हा आकडा 7,821.9 कोटी रुपये होता.

कंपनीचा ऑपरेटिंग नफा किंवा EBITDA सप्टेंबर तिमाहीत 13.8 टक्क्यांनी वाढून 449.6 कोटी रुपये झाला आहे, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 395.2 कोटी रुपये होता. त्याच वेळी EBITDA मार्जिन वाढून 5.5 टक्के झाले, जे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 5.1 टक्के होते.

शेअर्सची कामगिरी

निकालानंतर पतंजली फूड्सचे शेअर्स शुक्रवारी, 25 ऑक्टोबर रोजी झपाट्याने घसरले आणि 7.9 टक्क्यांनी घसरून 1,639 रुपयांवर बंद झाले. तर साेमवारी शेअर्समध्ये माेठी तेजी आली. शेअर्स 1,720.50 रुपयांवर पाेहाेचला आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये केवळ 4.56 टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या एका वर्षात शेअर्स 31.09 टक्क्यांनी वाढला आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

You Might Also Like

दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य…

पाकिस्तानमध्ये या व्यवसायाचं लायसन्स फक्त हिंदूंनाच मिळतं, दर वर्षी करतात कोट्यवधींची कमाई, नाव ऐकताच तुम्हालाही बसेल धक्का…

दूध आहे की विष? जामखेड १२०० लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त, महाराष्ट्रात खळबळ…

समुद्रातील किंग कोण? ते १४ देश…ज्यांच्याकडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता; यादीत भारत कितवा?

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

admin October 29, 2024 October 29, 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आरोग्यलेटेस्ट न्यूज

दीड मिनिटाला एक; ६ तासांत ५८३ पुरुषांसोबत शरीरसंबंध, आगळा वेगळा विक्रम तरुणीला पडला महागात अन्…

admin admin May 26, 2025
जगातील सर्वात ताकदवान भाजी, गुडघेदुखीवर रामबाण उपाय…
मंत्रीपद काय आमदारकीच धोक्यात? धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका; बजावली कारणे दाखवा नोटीस
‘लॉजच्या रुममध्ये घुसून.’; राष्ट्रवादीच्या नेत्याचं भयानक कांड, नेमक घडल काय ?
SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?