शेअर बाजारासाठी गुरुवार (24 ऑक्टोबर) हा चढ-उताराचा दिवस होता. आज सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद झाले. एचयूएलच्या खराब निकालांमुळे आज संपूर्ण एफएमसीजी क्षेत्र दबावाखाली राहिले आणि यामुळे बाजार वाढू शकला नाही.
बँक निफ्टी सुमारे 300 अंकांच्या वाढीसह 51,500 च्या वर बंद झाला.
Share Market Closing
सेन्सेक्स 16 अंकांनी घसरला आणि 80,065 वर बंद झाला. निफ्टी 36 अंकांनी घसरून 24,399 वर बंद झाला. बँक निफ्टी 292 अंकांनी वाढून 51,531 वर बंद झाला. वित्तीय, बँकिंग आणि हेल्थकेअर स्टॉक्स वगळता बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले.
निफ्टीमध्ये हिंदाल्को, एचयूएल, एसबीआय लाईफ, नेस्ले इंडिया, बजाज ऑटो यांचे सर्वाधिक नुकसान झाले. तर अल्ट्राटेक सिमेंट, श्रीराम फायनान्स, एम अँड एम, टायटन, ग्रासिम हे सर्वाधिक वाढले.
Share Market Closingकोणते शेअर्स घसरले?
निफ्टी पॅक शेअर्समध्ये आज सर्वात मोठी घसरण हिंदुस्तान युनिलिव्हर 5.84 टक्के, एसबीआय लाइफ 4.71 टक्के, हिंदाल्को 3.78 टक्के, नेस्ले इंडिया 2.80 टक्के आणि बजाज ऑटो 2.71 टक्क्यांनी झाली.
तर अल्ट्राटेक सिमेंटमध्ये सर्वाधिक 2.58 टक्के, श्रीराम फायनान्समध्ये 1.82 टक्के, टायटनमध्ये 1.47 टक्के, ग्रासिममध्ये 1.41 टक्के आणि महिंद्रा अँड महिंद्रामध्ये 1.31 टक्के वाढ झाली.
BSE SENSEXJio Hotstar Domain: ॲप डेव्हलपरने JioHotstarचे विकत घेतले डोमेन; आता अंबानींना पत्र लिहून केली मोठी मागणीक्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती
क्षेत्रीय निर्देशांकांत निफ्टी एफएमसीजीमध्ये 2.83 टक्क्यांची सर्वात मोठी घसरण झाली. याशिवाय निफ्टी ऑटोमध्ये 0.52 टक्के, निफ्टी आयटीमध्ये 0.19 टक्के, निफ्टी मीडियामध्ये 0.17 टक्के, निफ्टी मेटलमध्ये 0.23 टक्के, निफ्टी रियल्टीमध्ये 1.13 टक्के, निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये 0.39 टक्के घसरण झाली.
याशिवाय निफ्टी मिडस्मॉल हेल्थकेअरमध्ये 0.78 टक्के, निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये 0.07 टक्के, निफ्टी हेल्थकेअर इंडेक्समध्ये 0.37 टक्के, निफ्टी प्रायव्हेट बँकेत 0.37 टक्के, निफ्टी पीएसयू बँकेत 1.22 टक्के, निफ्टी फार्मामध्ये 0.44 टक्के, निफ्टीमध्ये 0.43 टक्के, निफ्टी बँक 0.57 टक्क्यांनी वाढले. कंपनीने सांगितले कारणगुंतवणूकदारांचे 1.26 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले
BSE वर कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 24 ऑक्टोबर रोजी 443.98 लाख कोटी रुपयांवर खाली आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच बुधवार, 23 ऑक्टोबर रोजी 445.31 लाख कोटी रुपये होते.
अशाप्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.26 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.26 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.



