By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: HDFC-ICICI Bank बॅंकेचे गुंतवणूकदार मालामाल; 5 दिवसांत कमावलेत 50000 कोटी रुपये!
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
बँकयशस्वी उद्योजकलेटेस्ट न्यूजशेअर मार्केट

HDFC-ICICI Bank बॅंकेचे गुंतवणूकदार मालामाल; 5 दिवसांत कमावलेत 50000 कोटी रुपये!

starmoney
Last updated: 2024/10/21 at 3:12 AM
starmoney Published October 21, 2024
Share
SHARE

DFC-ICICI Bank बॅंकेचे गुंतवणूकदार मालामाल; 5 दिवसांत कमावलेत 50000 कोटी रुपये!

 

शेअर बाजारात कोणता शेअर कधी झेप घेईल आणि गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव करेल, हे सांगता येत नाही. बँकिंग शेअर्संनी गेल्या आठवड्यात अशीच कामगिरी करून दाखवली आहे.

यामध्ये आयसीआयसीआय बँकेच्या गुंतवणूकदारांनी अवघ्या पाच दिवसांत 28,000 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर दुसरीकडे देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअर धारकांच्या संपत्तीत सुमारे 23,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

 

टॉप 10 पैकी चार कंपन्यांना फायदा

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी चढ-उतार पाहायला मिळाला. ज्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) 30 समभागांच्या सेन्सेक्समधील टॉप-10 मध्ये चार कंपन्यांच्या बाजार भांडवलात (मार्केट कॅप) मोठी वाढ झाली आहे. तर सहा टॉप कंपन्यांचे नुकसान झाले आहे. ज्या चार कंपन्यांचे बाजारमूल्य वाढले आहे. त्यांच्या एकत्रित मार्केट कॅपमध्ये 81,151.31 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर धारकांना सर्वाधिक फायदा झाला आहे.

 

एक दूरसंचार कंपनीचाही फायदा

गेल्या आठवड्यात सेन्सेक्समध्ये नफा कमावणाऱ्या चार कंपन्यांमध्ये तीन बँका आहेत. तर एक दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी देखील आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) सोबतच भारती एअरटेलचे मार्केट कॅप वाढले आहे. दुसरीकडे, मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL), आयटीसी आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांचे बाजारमूल्य घसरले आहे.

 

आयसीआयसीआय बँक अव्वल स्थानावर

गेल्या आठवड्यात खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक मार्केट कॅपमध्ये 28,495.14 कोटी रुपयांच्या उडीसह सर्वोच्च स्थानी राहिली आहे. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 8,90,191.38 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. यासह एचडीएफसी बँकेचा एमसीकॅप 12,82,848.30 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. या बँकेच्या शेअर धारकांनी केवळ पाच दिवसांत 23,579.11 कोटी रुपये छापले आहेत. एसबीआय बॅंकेचे मार्केट कॅप 17,804.61 कोटींनी वाढून, 7,31,773.56 कोटींवर रुपयांवर पोहोचले आहे. तर भारती एअरटेल या कंपनीचे बाजारमूल्य 11,272.45 कोटींनी वाढून, 9,71,707.61 कोटी रुपये इतके झाले आहे.

 

रिलायन्स कंपनीचा दबदबा कायम

गेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली असली तरी, टॉप-10 व्हॅल्युएबल फर्म्सच्या यादीत तिचा दबदबा कायम आहे. मुकेश अंबानींची ही कंपनी पहिल्या क्रमांकावर कायम आहे. यानंतर TCS, HDFC बँक, भारती एअरटेल, ICICI बँक, Infosys, SBI, हिंदुस्तान युनिलिव्हर, ITC आणि LIC यांना क्रमवारीत स्थान मिळाले आहे.

 

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर…

मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…

starmoney October 21, 2024 October 21, 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आरोग्य

थंडीत काय खावे? मटण की चिकन, तज्ज्ञांनी केला खुलासा, काय ठरेल आरोग्यदायी

admin admin December 14, 2024
महाकुंभ मेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाने 10 दिवसांत 10 कोटी कमावले?, सत्य काय ?
Video : मेडिकल कॉलेजवर कोसळलं विमान; जेवतानाचं विद्यार्थांवर काळाचा घाला, अनेकांचा मृत्यू …
बाजार गडगडला! १० लाख कोटींचा चुराडा, घसरणीमागील ३ प्रमुख कारणे
ट्रम्प यांच्या निर्णयाचा शेअर बाजाराला फटका! आयटीसी, एशियन पेंट्स, टाटासह या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?