By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
आंतरराष्ट्रीयक्रिप्टोताज्या बातम्याम्युच्युअल फंडराष्ट्रीयलेटेस्ट न्यूजशेअर बाजारशेअर मार्केटस्टर मनी विश्लेषण

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

admin
Last updated: 2026/01/20 at 11:23 AM
admin Published January 20, 2026
Share
SHARE

 

 

Copper ETF : आज जग वेगाने फ्युचर टेक्नॉलॉजी आणि क्लीन एनर्जीच्या दिशेने जात असताना सोनं-चांदीने आपला उच्चांक गाठला आहे. मात्र या सगळ्यात एक धातू शांतपणे अधिकाधिक महत्त्वाचा ठरत आहे.

हा धातू म्हणजे तांबे. त्यामुळेच सध्या Copper ETF चर्चेत आला आहे. चला तर मग, तांबा आणि Copper ETF बद्दल जाणून घेऊयात.

तांब्याची भूमिका बदलली

काही वर्षांपूर्वी तांब्याचा वापर मुख्यतः बांधकाम आणि कारखान्यांपुरताच मर्यादित होता. रिअल इस्टेट किंवा उत्पादन क्षेत्र मंदावले की तांब्याची मागणीही घटायची. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज तांबा डिजिटल जग आणि ग्रीन एनर्जी या दोन मोठ्या बदलांचा अत्यंत महत्त्वाचा घटक बनला आहे.

मागणी का वाढतेय?

आज रस्त्यांवर इलेक्ट्रिक गाड्या वाढत आहेत, सोलर-विंड एनर्जी प्रकल्प झपाट्याने वाढत आहेत आणि डेटा सेंटर्स उभे राहत आहेत. या सगळ्यांसाठी तांबा अत्यावश्यक आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर, येत्या काळात तांब्याची गरज सातत्याने वाढत जाणार आहे.

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?

डिजिटलायझेशन आणि एनर्जी ट्रान्झिशन हे सध्या जागतिक पातळीवरील दोन सर्वात मोठे ट्रेंड आहेत. एका इलेक्ट्रिक कारमध्ये पेट्रोल कारच्या तुलनेत जवळपास तीनपट जास्त तांबा लागतो. रिन्यूएबल एनर्जी प्रकल्प, चार्जिंग स्टेशन आणि स्मार्ट ग्रिड्सही तांब्याशिवाय शक्य नाहीत. त्यामुळे भविष्यात तांब्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांब्याचे दर अनेकदा विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.

तांब्याच्या पुरवठ्यावर ताण का?

नवीन तांब्याची खाण सुरू करणे सोपे काम नाही. एखादी नवी खाण कार्यान्वित होण्यासाठी 10 ते 15 वर्षे लागू शकतात. पर्यावरणीय नियम आणि वाढता खर्च यामुळे ही प्रक्रिया अधिक कठीण बनते.

दुसरीकडे, जगाची गरज मात्र सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुढील काळात तांब्याच्या पुरवठ्यावर ताण येण्याची शक्यता आहे. म्हणूनच तांबा येत्या काळासाठी अत्यंत महत्त्वाचा धातू बनत आहे.

तांब्यात गुंतवणूक कशी कराल?

जर तुम्हाला भविष्यातील दृष्टीने तांबा महत्त्वाचा वाटत असेल, पण थेट तांबा खरेदी करायचा नसेल, तर Copper ETF हा एक सोपा पर्याय तुमच्यासमोर आहे.

ETF म्हणजे Exchange Traded Fund. हा शेअरप्रमाणे ट्रेड होतो आणि तांब्याशी संबंधित कंपन्या किंवा खाणकाम व्यवसायांमध्ये गुंतवणूक करतो. भारतामध्ये सध्या स्वतंत्र Copper ETF उपलब्ध नसला, तरी आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक पर्याय आहेत.

भारतीय गुंतवणूकदार Liberalised Remittance Scheme (LRS) अंतर्गत परदेशात गुंतवणूक करू शकतात. यासाठी ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म्सचा वापर केला जातो. मात्र गुंतवणुकीपूर्वी हे लक्षात ठेवा की बहुतांश Copper ETF थेट तांब्यात नाही, तर तांबा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.

संधी मोठी, पण धोका देखील

तांबे दीर्घकाळासाठी मजबूत वाटत असले, तरी तांबा ही अजूनही सायक्लिकल कमॉडिटी आहे. म्हणजेच आर्थिक मंदी आल्यास त्याची मागणी अचानक घटू शकते. तांबा हा सोन्यासारखा ‘सेफ हेवन’ नाही. चीनची मागणी, जागतिक राजकारण आणि खाणकाम देशांची धोरणे याचा किमतींवर मोठा परिणाम होतो. म्हणूनच तांब्यात गुंतवणूक सावधपणे आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून करणे आवश्यक आहे. संबंधित तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्या !

You Might Also Like

दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य…

पाकिस्तानमध्ये या व्यवसायाचं लायसन्स फक्त हिंदूंनाच मिळतं, दर वर्षी करतात कोट्यवधींची कमाई, नाव ऐकताच तुम्हालाही बसेल धक्का…

दूध आहे की विष? जामखेड १२०० लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त, महाराष्ट्रात खळबळ…

समुद्रातील किंग कोण? ते १४ देश…ज्यांच्याकडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता; यादीत भारत कितवा?

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

TAGGED: Copper / तांबा, INDIA - भारत, शेअर मार्केट, 📈 शेअर मार्केट अपडेट्स
admin January 20, 2026 January 20, 2026
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News

Benefits of Yoga: 10 Ways Your Practice Can Improve Your Life

admin admin August 18, 2021
HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एंट्री, पाहा कुठे सापडले कीती रुग्ण
शेअर बाजारात 68 वर्षांची परंपरा; मुहूर्त ट्रेडिंगसाठी बाजार 1 तास का उघडला जातो?
विष प्राशन करण्याची धमकी देऊन करायचा तिचे लैंगिक शोषण, मुलीला विष पाजले अन …
Apple iMac M1 Review: the All-In-One for Almost Everyone
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?