By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: 2026 मध्ये सोनं फायद्याचं की चांदी? कोणती गुंतवणूक देणार मोठा रिटर्न?
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
आंतरराष्ट्रीयताज्या बातम्यालेटेस्ट न्यूजशेअर बाजारशेअर मार्केट

2026 मध्ये सोनं फायद्याचं की चांदी? कोणती गुंतवणूक देणार मोठा रिटर्न?

admin
Last updated: 2026/01/08 at 3:40 PM
admin Published December 25, 2025
Share
SHARE

भारतीय लोकांसाठी सर्वात आकर्षित गुंतवणूक असणार सोनं आणि चांदीसाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरलं. वर्षभरात दोन्हीच्या दरांमध्ये झालेल्या जबरदस्त उसळीमुळे गुंतवणूकदारांचा कल शेअर बाजाराऐवजी या मौल्यवान धातूंकडे वळला.

 

आता गुंतवणूकदारांसाठी मोठा प्रश्न असा आहे की २०२६ मध्येही ही तेजी कायम राहील का? आणि गुंतवणूकदारांसाठी सोनं चांगल की चांदी?

 

२०२५ मध्ये सोने-चांदीने का घातला धुमाकूळ?

गेल्या वर्षभरात MCX बाजारात सोन्याच्या भाव सुमारे ८० टक्क्यांनी वाढून प्रति १० ग्रॅममागे ७५,००० वरून १.३५ लाखांपर्यंत पोहचला आहे. तर चांदीने तर सोन्यालाही मागे टाकत वर्षभरात तब्बल १४५ टक्क्यांची उसळी घेतली आहे. चांदीचा भाव ९१,००० वरून आज २,२३,००० रुपयांवर पोहचला आहे. मात्र, याच काळात जर शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांक फक्त १० टक्केच वाढला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोनं-चांदीकडे अधिक सुरक्षित आणि नफा देणार पर्याय म्हणून पहिले आहे.

या तेजीमागची प्रमुख कारणे कोणती?

बाजार अभ्यासकांच्या मते, सोनं-चांदीच्या विक्रमी वाढीमागे अनेक जागतिक कारण आहेत. यात जागतिक बँकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली, तर औद्योगिक क्षेत्रातून चांदीची मागणी वाढली. दरम्यानच्या काळात अमेरिकेने टॅरिफ वाढीचे धोरण आणले यामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आणि त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं-चांदीमध्ये गुंतवणुक केली.

२०२६ मध्ये भाव कसे राहतील ?

तज्ज्ञांचे मत आहे की, २०२६ मध्येही सोनं-चांदीचे भाव मजबुतीत राहतील. मात्र, जेवढ्या प्रमाणात वाढ २०२५ मध्ये झाली आहे तेवढ्याच प्रमाणात वाढ २०२६ मध्ये होईल हे संत येत नाही. सध्या सोनं हे कमी जोखीम आणि स्थिर परतावा देणार साधन मानलं जात आहे. जागतिक बाजारात व्याजदर कमी राहणे, भूराजकीय तणाव, कमजोर डॉलरची आणि ETF मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीमुळे सोन्याच्या भाव पुढच्या वर्षात वाढू शकतात.

चांदीत जोखीम जास्त, पण मोठी संधी

चांदीबाबत तज्ज्ञ अधिक सकारात्मक दिसत आहेत. चांदी चे मूल्य केवळ मौल्यवान धातू नसून औद्योगिक धातू म्हणूनही तिचा वापर होतो. त्यामुळे तिच्या भावात अधिक चढ-उतार दिसू शकतो. इलेक्ट्रिक वाहने, सोलर पॅनल आणि नव्या तंत्रज्ञानात चांदीचा वापर वाढत असल्याने, २०२६ मध्ये टक्केवारीच्या दृष्टीने चांदी सोन्यापेक्षा जास्त परतावा देऊ शकते असं तज्ज्ञांचं मत आहे.

२०२६ मध्ये दर काय असतील ?

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार,

२०२६ अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ४,८०० ते ५,५०० डॉलर प्रति औंस दरम्यान जाऊ शकते.

भारतीय बाजारात याचा भाव १ लाख ५० हजार ते १ लाख ६५ हजार प्रति १० ग्रॅम असू शकतो.

चांदीचा दर ७५ ते ८५ डॉलर प्रति औंस, तर काही अंदाजानुसार १०० डॉलरपर्यंतही पोहोचू शकतो.

भारतात चांदी २,३०,००० रुपये ते २,५०,००० रुपये प्रति किलो दरम्यान जाऊ शकते.

कडाक्याच्या थंडीत शेकोटीजवळ ऊब घेताना व्यक्तीच्या बाजूला साप शांतपणे बसलेला दिसतो आणि माणूस त्याच्याशी गप्पा मारतो.
व्हिडिओत व्यक्ती बुंदेलखंडी भाषेत सापाशी मजेशीर आणि मैत्रीपूर्ण पद्धतीने बोलताना दिसतो.
माणूस आणि सापामधील हा मजेदार क्षण पाहून युजर्स हसत असून व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
साप हा जगातील सर्वाधिक धोकादाय प्राण्यांपैकी एक मानला जातो, त्याच्या एका विषारी डंकानेच तो भल्याभल्यांना मृत्यूच्या दारी पोहचवतो. अशात अलिकडेच इंटरनेट एक मजेदार व्हिडिओ व्हायरलझाला आहे ज्यात एक व्यक्ती सापासोबत गप्पा मारताना दिसून आला. थंडीच्या या दिवसांत व्यक्ती शेकोटी पेटवून ऊब घेत होता आणि त्याचवेळी सापही आपल्या शरीराला ऊब द्यायला तिथे पोहचला. व्हिडिओत शेकोटीसमोर व्यक्ती आणि त्याच्या बाजूला साप बसलेला दिसतो. माणूस त्याला काहीतरी सांगत असतो आणि जंगलाचा धोकादायक प्राणी लक्ष देऊन त्याच्या सर्व गोष्टी कान लावून ऐकत असतो. हे मजेदार दृश्य आता इंटरनेटवर सर्वांनाच हसवत असून लोक वेगाने व्हिडिओला शेअर करु लागले आहेत. चला व्हिडिओत काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

काय घडलं व्हिडिओत?

साप ज्याला पाहताच लोक दूर पळ काढतात अशा विषारी प्राण्याला व्यक्ती काहीतरी शिकवत आहे हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तर काहींनी माणूस सापाच्या ओळखीचा असेल अशा मजेदार प्रतिक्रिया दिल्या. आपण व्हिडिओ पाहू शकता यात एक माणूस कडाक्याच्या थंडीत शेकोटी पेटवून त्याची ऊब घेत आहे. यातच त्याच्या बाजूला एक सापही बसल्याचे दिसून येते जो शांतपणे माणूस काय बोलत आहे ते निमूटपणे ऐकूण घेत आहे. व्हिडिओ मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. माणूस न घाबरता, सापाशी मैत्रीपूर्ण आणि विनोदी बुंदेलखंडी भाषेत बोलतो. कधी तो त्याला शांत होण्यास सांगतो, तर कधी हसून त्याला चावू नये अशी विनंती करतो. हे सर्वच दृश्य लोकांना खळखळून हसवते.

सापासोबतची व्यक्तीचा मैत्री अनेकांना थक्क करणारी आहे. व्यक्ती सापाला पाहून पळत नाहीये आणि सापही लक्षपूर्वक त्याचे बोलणे ऐकूण घेत आहे हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. काहींनी माणूस सापाला या जगात कसं रहायचं याच ज्ञान देत असल्याचं म्हटलं तर काहींनी म्हटलं की साप व्यक्तीचा दूरचा नातेवाईक असावा. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत असून याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणत शेअर केला जात आहे.

येथे पहा !

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर…

मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…

TAGGED: 📈 शेअर मार्केट अपडेट्स
admin January 8, 2026 December 25, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
राजकीय

मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन?

admin admin February 19, 2025
Hands-On With the iPhone 13, Pro, Max, and Mini
खुल्लम खुल्ला प्यार करेंगे.. 55 वर्षांच्या दाजीशी 18 वर्षांच्या मेहुणीचे लग्न, तरुणी म्हणते- म्हातारा नाही, सुंदर आहे पती!
बलात्कार पीडितेला आरोपीच्या घरी पाठवलं, नराधमानं पुन्हा केले अत्याचार, १० जणांवर गुन्हा …
Can We Recreate Dinosaurs from Their DNA?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?