By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: व्हिएतनामचे एक लाख रुपये भारतात किती होतात ?, रक्कम ऐकून बसेल धक्का….
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
आंतरराष्ट्रीयलेटेस्ट न्यूजस्टर मनी विश्लेषण

व्हिएतनामचे एक लाख रुपये भारतात किती होतात ?, रक्कम ऐकून बसेल धक्का….

admin
Last updated: 2025/10/21 at 2:50 PM
admin Published October 21, 2025
Share
SHARE

व्हिएतनामची राजधानी हनोई सोमवारी जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली आहे. येथे १५ व्या नॅशनल असेंबलीचे १० वे सत्र सुरु आहे. जी २०२१ पासून ते २०२६ पर्यंतच्या कार्यकाळाची शेवटची बैठक आहे.

Contents
व्हिएतनामचे एक लाख रुपये भारतात किती होतात ?व्हिएतनामी डोंगची किंमतभारत आणि व्हिएतनाम सरासरी मासिक वेतनडॉलरच्या तुलनेत दोन्ही चलनाचे मुल्य कमी

 

यावेळी खासदारांच्या अजेंड्यात ५३ विधेयके आणि प्रस्ताव आहेत. हा एक प्रकारचा विक्रम आहे. कारण या आधी अधीच एवढ्या संख्येत विधेयके पास झाली नव्हती. संसदेचे चेअरमन त्रान थान मान यांनी यास ऐतिहासिक सांगत हे सत्र व्हिएतनामच्या विकासाची दिशा ठरवेल असे म्हटले आहे. व्हिएतनाम येथे जर १ लाख महिना कमाई केली तर भारतात त्याचे किती रुपये होतील हे पाहूयात..

 

व्हिएतनामचे एक लाख रुपये भारतात किती होतात ?

जर एखाद्या व्यक्तीने व्हिएतनाममध्ये १,००,००० व्हिएतनामी डोंग (VND) दर महिना कमावले तर ही रक्कम ऐकायला जर मोठी वाटत असली तरी तिचे मुल्य भारतीय चलन रुपयात कमी आहे. सध्या विनीमय दरानुसार १०,००० व्हिएतनामी डोंगची किंमत सुमारे ३३.४१ भारतीय रुपये होते. म्हणजे एक लाख व्हिएतनामी डोंगचे मुल्य सुमारे ३३४ रुपयांच्या समान आहे. यात भारतात तुम्ही चांगल्यात हॉटेलात जेऊ शकत नाही !

व्हिएतनामी डोंगची किंमत

व्हिएतनामी डोंग जगातील त्या चलनापैकी एक आहे ज्यांचे मुल्य आंतरराष्ट्रीय पातळीवर खूपच कमी आहे.याचे कारण व्हिएतनामची आर्थिक संरचना, सरासरी उत्पन्नाचा स्तर आणि चलन पुरवठ्याचे संतुलन. मात्र येथे राहाणीमानाचा खर्च भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे स्थानिक लोकांच्या दृष्टीने ही रक्कम तुलनात्मकदृष्ट्या अधिक उपयोगी ठरु शकते.

भारत आणि व्हिएतनाम सरासरी मासिक वेतन

जर तुलना करायची झाली तर भारतात सरासरी मासिक वेतन सुमारे १८,००० ते २५,००० रुपयांच्या दरम्यान आहे. तर व्हिएतनाम येथे सरासरी वेतन सुमारे ७ ते १० मिलियन VND म्हणजे सुमारे २०,००० ते २७,००० रुपयांच्या बरोबर होते. याचा अर्थ दोन्ही देशांची पर्चेजिंग पॉवर जवळपास सारखी आहे. परंतू चलनाचे मुल्य मात्र वेगवेगळे आहे.

डॉलरच्या तुलनेत दोन्ही चलनाचे मुल्य कमी

चलन विनिमय दर सतत बदलत असतो.तो अनेक घटकांवर अवलंबून असतो. उदा. विदेशी व्यापार संतुलन, महागाई दर, व्याज दर आणि आर्थिक स्थिरता. भारतीय रुपये आणि व्हिएतनामी डोंग दोन्ही आशियाई चलन आहेत. ज्याचे मुल्य डॉलरच्या तुलनेत खूपच कमी आहे. तरीही भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार आणि जागतिक स्थिती अधिक मजबूत मानली जाते.जर कोणी भारतीय व्हिएतनामला पर्यटनासाठी जात असेल तर त्याला कमी किंमतीमुळे खूपच स्वस्तात पडेल. खाणे-पिणे, कपडे आणि निवास यांच्या किंमती भारतापेक्षा येथे २० ते ३० टक्के कमी आहेत. त्यामुळे व्हिएतनामी डोंग जर स्वस्त वाटत असले तर स्थानिक पातळीवर त्याचे महत्व वेगळे आहे.

 

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर…

मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…

TAGGED: स्टर मनी विश्लेषण
admin October 21, 2025 October 21, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
लेटेस्ट न्यूज

महाभारत काळात कुंतीला दिलेला शाप, आजही भोगत आहेत सर्व महिला

admin admin January 26, 2025
9 Awesome Destinations for Solo Female Travelers
सोमवारी खुला होणार ‘हा’ तगडा आयपीओ; 1310 रुपये असेल किंमत
बीड पुन्हा हादरलं! शिक्षिकेवर १६ वर्षे अत्याचार, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा…
Key Trends Developing in Global Equity Markets
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?