अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी हे काही दिवसांपूर्वी भारताच्या दौऱ्यावर होते, भारत आणि अफगाणिस्तामध्ये वाढत असलेली जवळीक बघून पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला, त्यानंतर पाकिस्तानने कुरापत काढून अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक केला, या एअरस्ट्राईलकनंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तामध्ये चांगलीच चकमक झाली, या चकमकीमध्ये तालिबानी सैनिकांनी पाकिस्तानचे 58 सैनिक मारल्याचा तसेच 30 सैनिक गंभीर जखमी केल्याचा दावा अफगाणिस्तानकडून करण्यात आला होता.
तसेच या हल्ल्यामध्ये अफगाणिस्तानचे देखील 9 सैनिक मारले गेले होते. दरम्यान या हल्ल्यावेळी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुक्ताकी हे भारत दौऱ्यावर होते, त्यांनी भारतातूनच पाकिस्तानला कडक इशारा दिला होता, आम्हाला आमच्या देशात शांतता पाहिजे, मात्र जर कोणी हल्ल्याचा प्रयत्न केला तर आम्हाला आमची सुरक्षा कशी करायची? ते चांगलंच माहीत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान अफगाणिस्तानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा फार काळ निभाव लागला नाही, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे तब्बल 58 सैनिक मारले गेले. अफगाणिस्तानी सैनिकांच्या प्रचंड ताकदीपुढे पाकिस्तानी सौनिकांचा निभाव लागला नाही, त्यामुळे आता अनेकांना याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे की, अफगाणिस्तानी सौनिकांचा आहार नेमका कसा असतो, ते आपल्या आहारामध्ये कोणत्या प्राण्यांचं मांस सर्वाधिक खातात? याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
समोर आलेल्या माहितीनुसार अफगाणी सैनिक सर्वाधिक प्रमाणात मेंढीचं मासं खातात, अफगाण संस्कृतीमध्ये ही एक सामान्य गोष्ट आहे. अफगाणिस्तानमध्ये मेंढीचं मांस सर्वाधिक लोकप्रिय आहे, तिथे ते मोठ्या आवडीने खाल्लं जातं, आणि सौनिकांच्या रोजच्या आहारामध्ये या मांसाचा समावेश केला जातो. मेंढीचं मांस पुलाव, कबाब सारख्या पदार्थांमध्ये मिक्स करून ते अफगाणिस्तानी सौनिकांना दिलं जातं. मेंढीच्या मांसामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं, त्यामुळे कठीण परिस्थितीमध्ये या सौनिकांना लढण्यासाठी ताकद मिळते, अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात मेंढ्या पाळल्या जातात, त्यामुळे या देशात मेंढीचं मांस सहज उपलब्ध होतं, व ते मोठ्या आवडीने देखील खाल्लं जातं. मेंढीचं मासं हे तेथील लोकांच्या आहारातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. त्यासोबतच या सौनिकांना शेळीचं मटण आणि चिकनही दिलं जातं.



