By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले…
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
आंतरराष्ट्रीयलेटेस्ट न्यूजशेअर बाजार

ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले…

admin
Last updated: 2025/10/12 at 1:12 AM
admin Published October 12, 2025
Share
SHARE

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 100% टॅरिफ (आयात शुल्क) लावण्याची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. अमेरिका आणि चीनच्या शेअर मार्केटपासून ते क्रिप्टोकरन्सी बाजारापर्यंत सर्वत्र हाहाकार माजला आहे.

क्रिप्टो मार्केटमध्ये ऐतिहासिक घसरण

ट्रम्प यांच्या घोषणेनंतर क्रिप्टो मार्केटने एका दिवसातच सुमारे 560 अब्ज डॉलर (₹46.8 लाख कोटी रुपये) गमावले. बिटकॉइन, एथेरियम, डॉजकॉइन यांसारख्या प्रमुख डिजिटल करन्सी कोसळल्या.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या निर्णयाचा परिणाम जगभरातील 16 लाखांहून अधिक क्रिप्टो गुंतवणूकदारांवर झाला. केवळ एका तासातच 7 अब्ज डॉलरच्या पोझिशन्स जबरदस्तीने संपवाव्या लागल्या. एकूण 19 अब्ज डॉलरचे लिक्विडेशन झाले. डिजिटल अॅसेट्सच्या इतिहासातील ही सर्वात मोठी सामूहिक विक्री मानली जात आहे.

प्रमुख कॉइन्समध्ये मोठी पडझड

ट्रेडर्स मोठ्या प्रमाणात आपली लीव्हरेज्ड पोझिशन्स संपवत असल्यामुळे क्रिप्टो ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये 145% वाढ झाली आहे. कॉइनमार्केटकॅपच्या मते, क्रिप्टो मार्केट कॅप एका दिवसात $4.30 ट्रिलियन वरून $3.74 ट्रिलियनवर घसरले आहे.

शेअर मार्केटलाही धक्का

क्रिप्टोबरोबरच अमेरिकन शेअर बाजारातही घसरणीची लाट आली. NVIDIA, Tesla, Amazon यांसारख्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सवर जबरदस्त दबाव दिसला.
शेअर मार्केटमधील अंदाजे नुकसान 1.75 ट्रिलियन डॉलर इतके झाले आहे. म्हणजेच, क्रिप्टो आणि शेअर बाजार मिळून गुंतवणूकदारांचे एकूण नुकसान सुमारे 2 ट्रिलियन डॉलर (₹177 लाख कोटी रुपये) झाले.

डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
ट्रम्प यांनी त्यांच्या Truth Social प्लॅटफॉर्मवर जाहीर केले की, “1 नोव्हेंबर 2025 पासून चीनमधून आयात होणाऱ्या सर्व ‘महत्त्वाच्या सॉफ्टवेअर आणि वस्तूं’वर 100% टॅरिफ लागू होईल.” हा निर्णय चीनने रेअर अर्थ मटेरियल्सवर निर्यात निर्बंध आणल्यानंतर घेतला गेला आहे. यामुळे अमेरिका आणि चीनमधील व्यापारतणाव पुन्हा तीव्र झाला असून, जागतिक पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञान क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर…

मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…

admin October 12, 2025 October 12, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
लेटेस्ट न्यूजशेत-शिवार

महाराष्ट्र हवामान अंदाज:मान्सून पुन्हा सक्रिय,राज्यातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस,तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी …

admin admin June 12, 2025
पाकिस्तानची पुन्हा गेली जगासमोर लाज, घडला भयंकर प्रकार! Champions Trophy कशी होणार? पाहा Video
कॅन्सरचा संसर्ग होण्याआधीच थांबवणार सुपर व्हॅक्सीन; उपचारात घडणार क्रांती…
कर्जमाफी कशी होत नाही बघतोच.., फडणवीस तुमच्या परवानगीशिवाय.., शेतकऱ्यांसाठी जरांगेंनी ठोकला शड्डू…
सुषमा अंधारे आणि कामराच्या अडचणी वाढणार, हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला! दोघांना शिक्षा काय?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?