मराठवाड्यातील पावसाची तीव्रता 29 सप्टेंबर रोजी कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मात्र 29 सप्टेंबर रोजी फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून उर्वरित 7 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली होती. परंतु 28 सप्टेंबर पासून पावसाची तीव्रता ओसरू लागली आहे. पुढील काही दिवस मराठवाड्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने दर्शवली असून तेथे यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या चारही जिल्ह्यांना हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
तर जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज असून या 7 जिल्ह्यांसाठी कोणताही इशारा दिलेला नाही.
येथे पहा !
मराठवाड्यात पावसाने काही काळ उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात 2 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहू शकतो, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
नाशिक, पालघर, नंदुरबार आणि जळगाव येथे विजांच्या कडकडाटासह वादळे आणि मध्यम ते जोरदार पाऊस आणि ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



