माढा : तालुक्यातील दारफळ येथे सीना नदीच्या पुरात अडकलेल्या आठ नागरिकांना एअरलिफ्ट करण्यात आले. सुलतानपूर (राहुलनगर) येथील नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असून एनडीआरएफच्या आठ टीम दाखल झाल्या आहेत.
यापैकी निम्म्या टीम या सुलतानपूर येथील नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, निमगाव येथे एक म्हैस पुरात वाहून गेली आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दुपारी दारफळ येथे भेट देऊन पाहणी केली. आ. अभिजित पाटील यांच्या मागणीनुसार दारफळ व सुलतानपूर येथील नागरिकांना एअरलिफ्ट करण्याच्य सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. एनडीआरएफच्या आठ टीम तालुक्यात पोहोचल्या असून त्यापैकी चार टीम सुलतानपूर येथे, एक उंदरगावात, एक केवडमध्ये तर दोन वाकाव येथील नागरिकांच्या बचावकार्यात सहभागी झाल्या आहेत.
खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी कुंभेज व म्हैसगाव येथे भेट देत परिस्थितीची पाहणी केली. मंगळवारी सायंकाळपर्यंत प्रशासनाने पाचशे कुटुंबातील 2000 नागरिकांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी केले होते.