By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: तुला पोलिस अधिकारी बनवेन, माझ्यासोबत राहा; प्रशिक्षकाकडून वारंवार शरीरसुखाची मागणी…
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
क्राईमताज्या बातम्या

तुला पोलिस अधिकारी बनवेन, माझ्यासोबत राहा; प्रशिक्षकाकडून वारंवार शरीरसुखाची मागणी…

admin
Last updated: 2025/09/14 at 3:25 AM
admin Published September 14, 2025
Share
SHARE

नागपूर : शरीरसुखाची मागणी करीत मानसिक त्रास दिल्याने १९वर्षीय युवा कबड्डी खेळाडूने आत्महत्या केली. याप्रकरणी बुटीबोरी-एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कबड्डी प्रशिक्षकाला अटक केली.

संदीप प्रभू शेंडे (रा. चांदूररेल्वे, जि. अमरावती) असे अटकेतील प्रशिक्षकाचे तर सोनू (बदललेले नाव) असे मृतकाचे नाव आहे. सोनू ही राष्ट्रीय दर्जाची कबड्डी खेळाडू होती.

प्राप्त माहितीनुसार, दीड वर्षापूर्वी सोनू कबड्डी खेळण्यासाठी चांदूररेल्वे येथे गेली. येथे तिची संदीपसोबत ओळख झाली. ‘मी तुझे भविष्य घडवेल, तुला पोलिस अधिकारी बनवेल, तू माझ्यासोबत राहा’, असे संदीप सोनूला म्हणाला. सोनूने आई-वडिलांना याबाबत सांगितले. त्यानंतर सोनू ही चांदूर येथे भाड्याने खोली करून राहायला लागली. एप्रिल महिन्यात सोनू ही घरी परतली. ती कोणाशीही बोलत नव्हती. सतत तणावात राहायला लागली. बहिणीने सोनूला विचारणा केली. ‘तू मला आवडते, तू माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, नाही तर तुझे कबड्डीचे भविष्य मी उद्ध्वस्त करेल’, असे संदीप शेंडे नेहमी म्हणत असल्याचे सोनूने बहिणीला सांगून ती रडायला लागली. बहिणीने तिला धीर दिला.

‘परत जाऊ नकोस’, असे बहीण तिला म्हणाली. तेव्हापासून सोनू ही घरीच राहायला लागली. संदीप हा तिला व तिच्या नातेवाइकांच्या मोबाइलवर सतत संपर्क साधून सोनूला परत पाठविण्यासाठी दबाव टाकायला लागला. मानसिक दडपणात असलेल्या सोनूने ३१ जुलैला सकाळी ११ वाजताच्या सुमारास विष प्राशन केले. तिची प्रकृती खालावली. नातेवाइकांनी तिला एम्समध्ये दाखल केले. उपचारादरम्यान याच दिवशी सायंकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान संदीपने शारीरिक सुखाची मागणी करून दबाव टाकल्याने सोनूने आत्महत्या केल्याचे समोर आले.

पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून संदीपला अटक केली. संदीप हा सध्या न्यायालयीन कोठडीअंतर्गत कारागृहात आहे.

लग्न मोडल्याने बसला जबर धक्का
तणावात असलेल्या सोनूची नातेवाइकांनी समजूत घातली. तिला लग्नाबाबत विचारले. तिने होकार दिला. त्यानंतर ३० जुलैला सोनूचे यवतमाळ येथील युवकासोबत लग्न पक्के झाले. याची माहिती संदीपला मिळाली. संदीपने युवकाशी संपर्क साधला. ‘तू सोनूसोबत लग्न करू नकोस, तिचे चारित्र्य वाईट आहे’, असे संदीपने युवकाला सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी युवकाने सोनूच्या नातेवाइकांच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘मी सोनूसोबत लग्न करू शकत नाही. संदीपने मला तिच्याबाबत सर्व सांगितले आहे’, असे युवक नातेवाइकांना म्हणाला. ही बाब सोनूला कळाली. जबर धक्का बसल्याने सोनूने आत्महत्या केली.

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली सर्वात मोठी ऑफर, रशियावर होणार थेट परिणाम…

admin September 14, 2025 September 14, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आंतरराष्ट्रीयताज्या बातम्यालाईफस्टाईल

या 23 हॉटेलमध्ये खास प्रेग्रेंट होण्यासाठीच जातात महिला, कपल्सची लागते रांग, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का…

admin admin October 24, 2025
People in the Northeast Could Prevent a Covid-19 by Following These Measures
आश्रमात सुरू असलेल्या गैरकृत्यांचा पर्दाफाश,अश्लीलता! चैत्यानंद बाबाने 17 मुलींसोबत…
महाकुंभच्या वाटेत चेंगराचेंगरीसारखी स्थिती, लाखो भाविक 12 तासांपासून अडकून पडले; 25 किलोमीटरपर्यंत रांगा; संगम स्टेशन बंद केले
The Best Street Style From Paris Fashion Week Spring
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?