रशियाचं युक्रेनसोबत युद्ध सुरूच आहे. गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरू आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत या दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. प्रचंड प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे.
एक्सियोसच्या एका रिपोर्टनुसार बुधवारी नाटोचा सदस्य असलेल्या पोलंडमध्ये रशियाची विमानं दिसली आहेत, रशियानं हल्ला करण्यासाठी हे ड्रोन पाठवल्याचा दावा पोलंडकडून करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे अद्याप यावर रशियाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये.
रशियानं पोलंडवर का हल्ला केला?
पोलंडवर मिसाईल हल्ला का करण्यात आला? याबाबत रशियाकडून अद्यापपर्यंत कोणतंही स्पष्टिकरण देण्यात आलेलं नाहीये, मात्र असा अंदाज लावला जात आहे की, रशियाला युक्रेनवर हल्ला करायचा होता, मात्र ही मिसाईल चुकून पोलंडच्या हद्दीमध्ये घुसली असावीत. पोलंड हा युक्रेनचा शेजारी देश आहे. रशियाची चार क्षेपनास्त्र पाडल्याचा दावा पोलंडने केला आहे.
दरम्यान 1939 साली पोलंडवर केलेल्या हल्ल्यानंतरच दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती, हिटरने पोलंडवर हल्ला केला होता. तर आता रशियाकडून पोलंडवर हल्ला करण्यात आला आहे, रशिया हा नाटोचा सदस्य देश असल्यानं आता जगाचं लक्ष अमेरिकेकडे लागलं आहे.



