बीड : Beed Crime News: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर
अनेकदा अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यातून पीडिता गर्भवती राहिली. बीडच्या माजलगाव शहरात ही घटना मे महिन्यात उघडकीस आली.
या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव शहरातील 20 वर्षीय विद्यार्थिनीची पंचशीलनगर येथील सुनील विक्रम अलझेंडे (वय 30) याच्यासोबत मैत्री झाली. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर, पीडितेला विश्वासात घेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. तू मला आवडतेस, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे आमिष त्याने तिला दाखवले.
लग्नाचे आमिष दाखवून तिला घरी नेऊन अत्याचार केला. मागील महिन्यात पीडितेचे पोट दुखायला लागले. त्यानंतर, आई-वडिलांनी तिला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात नेले. तेथे तपासणी केली असता, पीडिता ही साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले.
घडलेला प्रकार समोर आल्यानंतर पीडितेन कुटुंबीयांच्या मदतीने 8 जून रोजी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात सुनील अलझेंडे विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भोसले हे करत आहेत.



