मंदसौरमध्ये भाजप नेते मनोहर लाल धाकड यांचा एक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. भानपुरा पोलीस स्टेशन परिसरातील दिल्ली-मुंबई एक्सप्रेसचा हा व्हिडीओ असल्याचे सांगण्यात आले
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोहर लाल धाकड यांचा मोबाईल बंद होता आणि त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती. पण रविवारी तो अचानक भानपूर पोलीस स्टेशनला पोहोचला आणि आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली. ज्यामध्ये त्याने आपल्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला. तर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी मनोहर धाकडला धाकड महासभा युवा संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव पदावरून काढून टाकण्यात आलंय. मनोहर लाल धाकड यांच्या पत्नी मंदसौर जिल्ह्यातील जिल्हा पंचायत सदस्या आहेत. पण आता मनोहर लाला धाकडचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झालाय.
मंदसौर जिल्ह्यातून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर एका कथित भाजप नेत्याचा उघडपणे सेक्स करतानाचा व्हिडिओ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा नेता मनोहरलाल धाकडला रविवारी पोलिसांनी अटक केली. त्याच वेळी त्याच्यासोबत दिसणाऱ्या महिलेचाही शोध घेतला जातोय. ती महिला कोण होती? उघडपणे संबंध ठेवण्यास ती कशी तयार झाली, अशी तिच्यावर सक्ती होती का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिचा शोध घेतला जातोय. महिलेची ओळख पटली असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
दुसरा व्हिडीओही व्हायरल
दिल्ली- मुंबई एक्सप्रेसवर त्या रात्री मनोहर धाकडने शारीरिक संबंध ठेवले आणि सर्व हद्द पार केली. संबध बनवल्यानंतर मनोहर धाकडने महिलेसोबत एक्सप्रेसवेवर डान्सदेखील केला. दोघांचे अश्लील नृत्य तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. तसेच या फुटेजच्या आधारे धाकडसोबत ब्लॅकमेलिंग झाल्याचा प्रकार समोर आलाय. मंदसौर पोलिसांनी धाकडसा अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली. एक्सप्रेसवेवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा रेकॉर्डनुसार हा व्हिडीओ 13 मे 2025 च्या रात्रीचा आहे. पहिला व्हिडीओ 8 वाजून 22 ते 8 वाजून 28 मिनिटांपर्यंतचा आहे. या वेळेत दोघेही कारमधून बाहेर येऊन संबंध बनवताना दिसताय. कोणती गाडी शेजारुन गेली की दोघे कारमध्ये जाताना दिसतात. मग रस्ता मोकळा दिसला की पुन्हा संबंध बनवताना दिसतात.
दुसरा व्हिडीओदेखील त्याच रात्रीचा
दुसरा व्हिडीओदेखील त्याच रात्रीचा आहे. 8.28 मिनिटे झाली असता दोघेही बाहेर येऊन हायवेवर फिरतात. या व्हिडीओत धाकडची महिला मैत्रिण नग्न अवस्थेत दिसतेय. दोघेही काही अंतरावर जातात आणि मग हात पकडून नाचू लागतात. यानंतर पुन्हा कारमध्ये जाऊन बसतात. रहदारी असलेल्या या हायवेवर दोघांनी अश्लील नृत्य केल्याचे समोर आल्यानंतर सगळीकडून संताप व्यक्त होतोय.
22 मे रोजी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण चर्चेत आले. मात्र, व्हायरल झालेला व्हिडिओ १३ मे चा आहे. इतक्या दिवसांनी तो समोर येण्यामागील कारण म्हणजे ब्लॅकमेलिंगचा विषय. एनएचएआयने तीन कर्मचाऱ्यांनाही निलंबित केले आहे. गरज पडल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे. येथे, माजी भाजप नेते मनोहर लाल धाकडच्या अटकेनंतर आता महिलेचा शोध घ्यायला वेग आलाय. येथे मनोहरलाल धाकडला सोमवारी सायंकाळी जामीन मिळाला पण महिलेला अटक करता आली नाही.
व्हिडिओ येथे पहा !
ती महिला कोण?
व्हिडिओमध्ये दिसणारी महिला मंदसौर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिक्षिका आहे आणि तिच्या बदलीबाबत ती मनोहरलाल धाकड यांच्या संपर्कात आली होती, असा दावा एका काँग्रेस नेत्याने केलाय. संबंधित महिला सरकारी शाळेत शिक्षिका आहे. आरोपी नेत्याची पत्नी जिल्हा पंचायतीची सदस्य आहे, ही माहिती खरी असल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केलाय. सरकारी शाळादेखील जिल्हा पंचायतीच्या अंतर्गत येतात. त्यामुळे नेत्याने संबंधित शिक्षिकेला तिच्या नोकरीबाबत बदलीची किंवा राजकीय प्रलोभनाची भीती दिली असावी. त्यामुळे हे प्रकरण बलात्कारापर्यंत जाऊ शकते, त्यामुळे पोलिस तपास निष्पक्ष असावा, अशी मागणीही त्यांनी केलीय.
महिलेला लवकरच अटक केली जाईल- पोलीस
मंदसौरच्या भानपुरा पोलिसांनी मनोहरलाल आणि त्याच्या महिला साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य निंदनीय आहे. महिलेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पण व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेची ओळख पटलीय. ती मनोहरलालची जुनी मैत्रिण असल्याची माहिती डीआयजी मनोज सिंह यांनी दिली. पोलीस पथक महिलेचा शोध घेत असून लवकरच त्या महिलेलाही अटक केली जाईल, असेही त्यांनी पुढे सांगितले.