पु ण्यातील कोंढवा परिसरातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या जुन्या मित्राला चहासाठी घरी बोलावून त्याच्याविरुद्ध भयानक कट रचला. प्रथम मोठ्या आपुलकीने मित्राला घरी बोलावलं आणि तो घरात येताच महिलेने त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली.
मिरचीमुळे डोळे झोंबायला लागल्यामुळे त्याला दिसणे बंद झाले. पण या महिलेने हे सर्व का केलं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…
तिघे साथीदारही पोहोचले
महिलेने मित्रावर हा हल्ल्या केल्यानंतर तिचा पती आणि इतर दोन साथीदार घरी आले. ते बराचवेळ हे सर्व घडण्याची वाट पाहात होते. चौघांनी मिळून पीडिताला बेदम मारहाण केली. एवढेच नाही, तर त्याच्या तोंडात काठी कोंबली आणि हात-पाय दोरीने घट्ट बांधले गेले. या घटनेवरून स्पष्ट होते की हे सर्व काही आधीच नियोजित होते.
खंडणीसाठी रचला गेला संपूर्ण कट
पीडिताला हे सर्व पूर्णपणे असहाय्य होत होते. त्यानंतर आरोपींनी त्याच्याकडे खंडणीची मागणी केली. हे प्रकरण केवळ हल्ल्याचे नव्हे, तर सुनियोजित अपहरण आणि पैशांची मागणी यांच्याशी संबंधित होते. ही बाब समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. कोंढवा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी वेळ न दवडता तात्काळ कारवाई केली. अवघ्या चार तासांत त्या व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि या चार आरोपींना अटक करण्यात आली.
अटक केलेल्या आरोपींची ओळख
अटक केलेल्यांमध्ये महिला सोनल उर्फ सोनी रायकर (वय 35), तिचा पती अतुल रायकर (वय 38) आणि त्यांचे दोन साथीदार रवी मंडल (वय 24) व सुशांत हान (वय 31) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी पुण्यातील कोंढवा परिसरातील रहिवासी आहेत. पीडित व्यक्तीचे वय 39 वर्षे आहे आणि त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
जुनी मैत्री ठरली धोकादायक
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि पीडित यांची अनेक वर्षांपासून मैत्री होती. दोघांमध्ये आधीपासूनच ओळख होती, याच विश्वासावर तो कोणताही संशय न बाळगता तिच्या घरी चहासाठी गेला होता. पण या विश्वासाचा असा भयंकर अंत होईल, याचा कोणीही विचार केला नव्हता.