By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: रॉड, कत्ती, बेल्ट, काठीने शिवराजला मारणारे 7 जण कोण? सगळ्या आरोपींची नावं, खळबळजनक …
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > क्राईम > रॉड, कत्ती, बेल्ट, काठीने शिवराजला मारणारे 7 जण कोण? सगळ्या आरोपींची नावं, खळबळजनक …
क्राईम

रॉड, कत्ती, बेल्ट, काठीने शिवराजला मारणारे 7 जण कोण? सगळ्या आरोपींची नावं, खळबळजनक …

admin
Last updated: 2025/05/18 at 1:30 PM
admin Published May 18, 2025
Share
SHARE

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीडमध्ये गुन्हेगारीची राज्यभर चर्चा झाली. सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निघृण हत्या केली, त्या घटनेनं राज्य हळहळलं होतं.

मात्र, तरीही बीडमधील गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेईना. परळीत गेल्या दोन दिवसांपूर्वी तसंच रिंगण करुन एका तरूणाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणात आता सात आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांची नावं समोर आली आहेत.

परळी तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात 16 मे रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास झालेल्या मारहाणीच्या गंभीर प्रकरणी परळी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. यापैकी दोन आरोपी अल्पवयीन असून, त्यांना बीड येथील बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं आहे. तर अन्य पाच आरोपींना परळी न्यायालयाने 20 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

 

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवराज नारायण दिवटे हा आपला मित्र जयदिप मुंडे याच्यासह मोटारसायकलवरुन लिंबोटी गावाकडे जात होता. त्यावेळी रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ तीन ते चार मोटारसायकलस्वारांनी त्यांची गाडी अडवली. यानंतर आरोपींनी शिवराजला हाताने मारहाण करुन जबरदस्तीने रत्नेश्वर डोंगरातील झाडीमध्ये नेलं. तिथं सुमारे 20 जणांनी शिवराजला लोखंडी रॉड, कत्ती, बेल्ट, काचेची बाटली आणि लाकडी काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केलं. “हा त्या भांडणात होता, याला मारुन टाका,” असं म्हणत आरोपींनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शिवराज यांनी जोरजोरात ओरडत मदतीसाठी याचना केल्या. तेव्हा काहीजण धावून आले. पण तोपर्यंत शिवराज बेशुद्ध झाला होता. या मारहाणीचा व्हिडीओ मारहाण करणाऱ्याच काहींनी मोबाईलवर रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर व्हायरल केला.

 

पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सचिन विष्णु मुंडे (24, नंदागौळ), समाधान श्रीकृष्ण मुंडे (20, टोकवाडी), रोहन उमेश वाघुळकर (18 वर्ष 11 महिने, विद्यानगर), अदित्य बाबासाहेब गित्ते (18 वर्ष 10 महिने, नंदागौळ), तुकाराम ऊर्फ ऋषीकेश ज्ञानोबा गिरी (18 वर्ष 3 महिने, टोकवाडी) यांचा समावेश आहे. याशिवाय दोन अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

जखमी शिवराज याच्यावर आधी परळीतील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. नंतर पुढच्या उपचारासाठी त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. 17 मे रोजी शिवराज याच्या तक्रारीवरुन परळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 105/2025 अंतर्गत कलम 109, 126(2), 140(3), 118(1), 189(2),189(4), 190, 191(3) BNS अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय.

दरम्यान, पोलिसांनी एकूण 20 आरोपींपैकी सात जणांना ताब्यात घेतलं असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारेही तपासाला गती देण्यात येत आहे.

You Might Also Like

५० पेक्षा जास्त तरुणींवर अत्याचार, ३ हजारांहून अधिक…; वासनेने पेटलेला ट्रॅक्सी ड्रायव्हर अखेर कसा पकडला गेला?

Video : मनोहर धाकडने त्या रात्री हायवेर Se* केल्यानंतर पुढे काय केलं?

पुणे हादरलं! मित्राला चहासाठी बोलावलं,रचला गेला संपूर्ण भयंकर कट …

हृदयद्रावक घटना आईसह दोन निष्पाप बालकांना पेट्रोल ओतून जिवंत जाळले …

भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद …

TAGGED: Beed - बीड
admin May 18, 2025 May 18, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
धार्मिक

मृत्यूच्या वेळी व्यक्तीला ‘असं’ काय दिसतं? शेवटच्या क्षणी आवाज का बंद होतो? गरुड पुराणातून सत्य जाणून घ्या..

admin admin December 16, 2024
मेहुणीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने दाजीने केली हत्या! मुंडके कापून फेकले …
F-47 : जगातील सर्वात घातक अस्त्राच्या निर्मितीची घोषणा, ‘कोणी आसपास पण फिरकरणार नाही’
या लोकांनी चुकूनही टरबूज खाऊ नये, जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम …
4 वर्षात 1 लाखाचे झाले 76 लाख रुपये; ‘या’ इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअर्सचा 1 वर्षात हजार टक्के परतावा!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?