By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: मोठी बातमी ! देवस्थान जमिनीच्या व्यवहारांना ब्रेक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नोंदणी विभागाला निर्देश …
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > लेटेस्ट न्यूज > मोठी बातमी ! देवस्थान जमिनीच्या व्यवहारांना ब्रेक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नोंदणी विभागाला निर्देश …
लेटेस्ट न्यूज

मोठी बातमी ! देवस्थान जमिनीच्या व्यवहारांना ब्रेक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नोंदणी विभागाला निर्देश …

admin
Last updated: 2025/05/14 at 4:15 PM
admin Published May 14, 2025
Share
SHARE

महाराष्ट्र शासनानं देवस्थान वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवरील नोंदणी प्रक्रिया तत्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे येथील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या उपमहानिरीक्षक (मुख्यालय) कार्यालयातून जारी झालेल्या परिपत्रकानुसार, शासन धोरण ठरविण्यात येईपर्यंत कोणत्याही देवस्थान इनाम मिळकतींच्या दस्तऐवजांची नोंदणी करता येणार नाही. हा निर्णय 13 मे रोजी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली, कोल्हापूरचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीत देवस्थान वतन जमिनींसंबंधी अनधिकृत व्यवहार रोखण्यासाठी धोरणात्मक चर्चा झाली आहे.

जमिनींचे व्यवहार थांबणार

शासन धोरण येईपर्यंत देवस्थान जमिनींचे व्यवहार थांबवा असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी विभागास दिले आहेत. फक्त न्यायालयीन आदेश किंवा अधिकृत मंजुरी असलेल्या जमिनींचेच दस्त नोंदणीस मान्य देण्यात येणार आहे.

काय आहे आदेश

13 मे 2025 रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक झाली होती. त्यात देवस्थान मिळकतीबाबत निर्देश देण्यात आले. देवस्थान इनाम मिळकतीच्या अनुषंगाने शासन स्तरावर धोरण ठरवण्यात येत आहे. त्यामुळे या जमिनीविषयी सक्षम अधिकाऱ्याचे विक्री आदेश अथवा न्यायालयाकडून विक्री आदेश असतील तरच देवस्थान मिळकतीचे व्यवहार करता येतील. त्याऐवजी राज्यातील कोणत्याही देवस्थान मिळकतीचे खरेदी-विक्री व्यवहारांचे दस्त नोंदणीस स्वीकारू नये असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. असे दस्त स्वीकारल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित दुय्यम निबंधक यांची असेल असे बैठकीत स्पष्ट केले.

येथे वाचा तो आदेश

revenue minister order

या जमिनीचे व्यवहार टाळा

महसूल विभागाच्या या नवीन आदेशापूर्वी सुद्धा अनेकदा या खात्याने शेतकरी आणि इतरांना अशा जमिनी खरेदी करताना खबरदारीचा इशारा दिला होता. देवस्थान व राखीव वन नोंदी असलेल्या जमिनीची खरेदी डोकेदुखी ठरू शकते. कारण या जमिनीची मालकीचा प्रश्न अडचणीचा ठरतो. अशा जमिनीवर एकतर नावावर होत नाही. त्यामुळे आर्थिक तोटाही होतो. जमीन पण हातातून जाते आणि उल्लंघनाची कारवाई होते ती वेगळीच. काही एजंट विविध यंत्रणांना हाताशी धरून या जमिनी नावे लावून देतात. पण प्रकरण उघड झाले की नामनिराळे होतात. या व्यवहारात जमीन खरेदीदारांचे सर्वात जास्त नुकसान होते. त्यामुळे अशा जमिनी खरेदीचे व्यवहार टाळणे शहाणपणाचे ठरेल.

You Might Also Like

दीड मिनिटाला एक; ६ तासांत ५८३ पुरुषांसोबत शरीरसंबंध, आगळा वेगळा विक्रम तरुणीला पडला महागात अन्…

भयंकर ! कार झाडाला धडकली, कारचे दोन तुकडे , एअरबॅग्ज फाटून तिघांचा जागीच मृत्यू …

पाकिस्तानला कर्ज दिल्यानंतर IMF चिंतेत, आता या 11 नवीन अटी लादल्या

मोठी बातमी ! भारताचा पाकिस्तानवर पलटवार; लाहोर, सियालकोटमध्ये हल्ले, पेशावरमध्ये झाला स्फोट !

Video : पाकिस्तानच्या कुरापती थांबेना, जम्मूत ड्रोन हल्ला, भारताकडून चोख प्रत्युत्तर …

admin May 14, 2025 May 14, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
टेक-गॅजेटलेटेस्ट न्यूजशेअर मार्केट

शेअर मार्केटमध्ये आज मुहूर्ताचं ट्रेडिंग, खरेदीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे ५ शेअर

admin admin November 1, 2024
संतोष देशमुख हत्येप्रकरणी फरार असलेल्या कृष्णा आंधळेबद्दल आमदाराचा मोठा खुलासा, म्हणाला “24 तासात.”
चेंगराचेंगरीनंतर महाकुंभमेळ्यात पुन्हा भीषण आग! अनेक तंबू आगीच्या भक्षस्थानी, घटनेनं खळबळ
Hyundia India IPO : देशातील सर्वात मोठ्या IPO चा गुंतवणूकदारांना धक्का!
धनंजय मुंडेंवर कारवाई कधी होणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले …
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?