भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर आता भारत- पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढतानाचे चित्र आहे. आताच आलेल्या बातमीनुसार, भारताच्या S-400 ने पाकिस्तानचे आठ मिसाईल नष्ट केली होती, त्यानंतर आता भारतीय सेनेने पाकिस्तानचे फायटर F-16 हे जेट पाडले आहे.
व्हिडिओ येथे पहा !
लष्कराने पाकिस्तानची 8 क्षेपणास्त्रे पाडली
संरक्षण सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानने सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया सेक्टरमध्ये 8 क्षेपणास्त्रे डागली, ती सर्व भारतीय हवाई संरक्षण दलाने पाडली. यादरम्यान उधमपूरमध्ये संपूर्ण वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे आणि लोकांना त्यांच्या घरी जाण्याचे आवाहन केले जात आहे.
लाहोर, इस्लामाबाद टार्गेटवर!
पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागात केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताकडून पाकिस्तानच्या दिशेने अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. आता लाहोर आणि इस्लामाबाद भारताच्या टार्गेटवर असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक
पाकिस्तानकडून हल्ले सुरु झाल्यानंतर हल्ल्यांदरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सीडीएस आणि तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. या बैठकीत नेमके काय झाले हे अधिकृतरित्या समजले नाही.