प हलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारताने 15 दिवसांनी बदला घेतला. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकड्यांची खुमखुमी जिरवली. पाकिस्तानात 100 किमी आत घुसून भारताने दहशतवादी तळ उडवून लावले. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर भ्याड हल्ले सुरु करण्यास सुरुवात केली.
यापूर्वी, गो होमस्टेजने तुर्की एअरलाइन्ससोबतची पाटर्नशिप तोडण्याची असल्याची घोषणा केली होती. भारताबद्दलच्या तुर्कीच्या भूमिकेमुळे आम्ही तुर्की एअरलाइन्ससोबतची आमची पाटर्नशिप अधिकृतपणे संपवत आहोत. पुढे जाऊन आम्ही आमच्या आंतरराष्ट्रीय प्रवास पॅकेजमध्ये त्यांच्या फ्लाइट्सचा समावेश करणार नाही. जय हिंद, असे ट्विट करत कंपनीने स्पष्ट केले होते.
एर्दोगन यांचा पाकिस्तानला पाठिंबा
भारताच्या लष्करी कारवाईनंतर तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता. पाकिस्तानच्या “शांत आणि संयमी धोरणाचे” त्यांनी कौतुक करुन राजनैतिक पाठिंबा दिला होता. त्यानंतर एर्दोगन यांच्या पाकिस्तानी धार्जिण्या भूमिकेवर भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
India Pakistan Border: LOC वर भारताची किती राज्ये, पाकचे किती प्रांत? जाणून घ्या..
तुर्की नागरिकांवर बहिष्कार
तुर्की नागरिकांना भारतीय सेवा वापरण्यास बंदी घालणारा कोणताही अधिकृत सरकारी निर्देश नसला तरी, काही भारतीय होमस्टे आणि प्रवास कंपन्यांनी निषेध म्हणून तुर्की नागरिकांवर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्यापक बहिष्काराच्या आवाहनांचा एक भाग म्हणून तुर्की प्रवासी कंपन्या आणि पर्यटनाशी संबंध तोडण्याचे आवाहन केले जात आहे.