भारत-पाकिस्तानातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले गेले. त्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे.
काश्मीरमधील शाळा बंद
पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमधील नागरी वस्त्यांवर लक्ष्य साधले जात आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील बारामूला आणि कुपवाडा जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा तसेच श्रीनगर आणि अवंतीपोरा विमानतळाजवळील शाळा ९ आणि १० मे रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
व्हिडिओ येथे पहा !
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे जोरदार प्रत्युत्तर
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर एअर स्ट्राईक करून ते उद्ध्वस्त केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांमधील लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र याला भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर देत हवेतच उद्ध्वस्त केले. यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार सिस्टीम ड्रोन हल्ल्यांच्या माध्यमातून उद्ध्वस्त केली.