By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसाची कोठडी; काय काय घडलं?
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > आंतरराष्ट्रीय > मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसाची कोठडी; काय काय घडलं?
आंतरराष्ट्रीय

मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसाची कोठडी; काय काय घडलं?

admin
Last updated: 2025/04/11 at 12:13 AM
admin Published April 11, 2025
Share
SHARE

मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याला अखेर आज रात्री पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं. विमानतळावर आल्यानंतर राणाला अडीच तासानंतर कोर्टात आणण्यात आलं. त्यानंतर कोर्टात सुनावणी सुरू झाली.

 

यावेळी एनआयएच्या वकिलांनी राणाची 20 दिवसाची कोठडी मागितली. राणाच्या कोठडीची कारणंही वकिलाने कोर्टासमोर मांडली. तसेच राणा हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याने काही पुरावे आणि तथ्य मिळवण्यासाठी त्याची कोठडी हवी आहे, असा युक्तिवाद एनआयएच्या वकिलांनी केला. कोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून राणा याला 18 दिवसाची कोठडी दिली आहे.

 

तहव्वूर राणाला पटियाला हाऊस कोर्टात आणण्यात आलं. यावेळी एनआयएच्या वकिलाने राणाला 20 दिवसाची कोठडी देण्याची मागणी केली. सुनावणीच्यावेळी एनआयएच्या वकिलांनी खटल्याशी संबंधित काही तथ्य समोर ठेवले. सुनावणी बंद खोलीत झाली. कोर्टात तहव्वूर राणा, लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीने दिलेला त्याचा वकील आणि एनआयएच्या लीगल टीमसह जज आणइ कोर्टाचा स्टाफ उपस्थित होता. एनआयएकडून ज्येष्ठ वकील कृष्णन यांनी कोर्टात युक्तिवाद केला.

 

कोर्टात सुनावणी सुरू असताना सुरक्षा रक्षकांचा कोर्टाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षा रक्षकांनी कोर्टाबाहेर रूट मार्च काढला. या परिसरात वाहनांना मज्जाव करण्यात आला होता. कोणत्याही वाहनाला कोर्ट परिसरात प्रवेश दिला जात नव्हता. तसेच कोणत्याही व्यक्तीला आत सोडण्यात येत नव्हते.

 

कार्यालय सॅनिटाईज

विमानतळावर अटक करण्यात आल्यानंतर अडीच तासानंतर राणाला कोर्टात आणण्यात आलं. विमानतळावरच त्याची मेडिकल चेकअप करण्यात आली होती. कोर्टातून राणाला थेट एनआयएच्या मुख्यालयात नेण्यात येणार आहे. त्यामुळे एनआयएचं मुख्यालय सॅनिटाईज करण्यात आलं आहे. एनआयएच्या कार्यालयाबाहेर डॉग स्क्वॉडची टीम तैनात करण्यात आली आहे. मुख्यालयाबाहेरच्या प्रत्येक गोष्टीची तपासणी करण्यात येत आहे.

 

अमेरिकेची प्रतिक्रिया काय?

तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पण प्रकरणी अमेरिकेच्या न्याय विभागाचे प्रवक्ते निकोल नवास ऑक्समन यांनी मीडियाशी संवाद साधला आहे. प्रत्यार्पण 26/11 च्या पीडितांना न्याय देण्यासाठीचं महत्त्वाचं पाऊल आहे. अमेरिकेने दोषी दहशतवादी तहव्वूर राणाला भारतातील हल्ल्याप्रकरणी प्रत्यार्पित करण्यात आले आहे. त्याच्याशी संबंधित 10 गुन्हे भारताने दाखवले होते. दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. राणाचं प्रत्यार्पण म्हणजे त्या अमेरिकन नागरिकांना न्याय देण्यासाठी उचलण्यात आल्याचं हे पाऊल आहे, असं निकोल नवास ऑक्समन म्हणाल्या.

 

You Might Also Like

मोठी बातमी ! पाकिस्तानने युद्धविराम तोडला, जम्मूत पुन्हा ब्लॅकआऊट ..

भारताने पाकिस्तानच्या ‘या’ ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या …

मोठी बातमी ! जम्मू विमानतळावर रॉकेट हल्ला, 8 – 10 ठिकाणी स्फोटाचे आवाज …

पाकिस्तान प्रेम पडलं महागात! तुर्की नागरिकांना गोव्यातील सुविधा बंद, भारताकडून एर्दोगन यांचा तीव्र निषेध ..

एखाद्या देशाने अणुबॉम्ब टाकला तर रेडिएशनपासून कसे वाचावे? जाणून घ्या …

TAGGED: America - अमेरिका, INDIA - भारत, Terrorism - दहशतवाद
admin April 11, 2025 April 11, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
करकर्जक्रिप्टोटेक-गॅजेटडिमॅट खातेबँकम्युच्युअल फंडयशस्वी उद्योजकलाईफस्टाईललेटेस्ट न्यूजशेअर मार्केटस्कॉलरशिप

दिवसा दुप्पट, रात्री चौप्पट! सोन्याचे भाव बघूनच ग्राहकांच्या कपाळाला आठ्या

starmoney starmoney October 21, 2024
‘धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत लग्न केलंच नाही, वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय झालं?
शेअर मार्केटमध्ये आज मुहूर्ताचं ट्रेडिंग, खरेदीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे ५ शेअर
What Are Some Ways to Prevent the Spread of COVID-19?
केवळ 15 दिवसात कोलेस्ट्रॉलचा उडेल फज्जा, रोज सकाळी उपाशीपोटी खाल ‘हा’ मसाला; होईल कमाल …
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?