एक काळचे राजे…
टिगिरियाचे राजा ब्रजराज क्षत्रिय बिर्बर चंपुपती सिंह मोहोपात्रा हे ब्रिटिश भारतातील प्रसिद्ध प्लेबॉय राजे होते.
Tigiria King Mahapatra Tragic Story
शाही थाट
त्यांच्याकडे २५ व्हिंटेज गाड्या होत्या. हत्तीवरून प्रवास, सिंहाची शिकार आणि महालात आलिशान जीवन असा त्यांचा दैनंदिन दिनक्रम होता.
Tigiria King Mahapatra Tragic Story
स्वातंत्र्यानंतर बदलले नशीब
१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि टिगिरिया संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले. त्यामुळे करांचा महसूल बंद झाला.
Tigiria King Mahapatra Tragic Story
फक्त ११,२०० रुपये वार्षिक
त्यांना सरकारकडून फक्त ११,२०० रुपये वार्षिक पेन्शन मिळू लागली. खर्च भागवण्यासाठी त्यांनी आपला महाल विकला.
Tigiria King Mahapatra Tragic Story
महालच बनला मुलींची शाळा
ब्रजराजसिंह यांनी विकलेला महाल आता एका मुलींच्या हायस्कूलमध्ये रूपांतरित झाला आहे.
Tigiria King Mahapatra Tragic Story India Gandhi Government
इंदिरा गांधींचा निर्णय ठरला घातक
इंदिरा गांधी सरकारने शाही सवलती रद्द केल्यावर त्यांची पेन्शनही थांबली. त्यामुळे ते पूर्णपणे आर्थिक संकटात सापडले.
Tigiria King Mahapatra Tragic Story
चिखलाच्या घरात राजे!
राजा ब्रजराजसिंह अखेरच्या काळात आपल्या कुटुंबापासून दूर, गावातल्या चिखलाच्या घरात एकटे राहू लागले.
Tigiria King Mahapatra Tragic Story
२०१५ मध्ये घेतला शेवटचा श्वास
नोव्हेंबर २०१५ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारांची व्यवस्था गावकऱ्यांनीच केली.
Tigiria King Mahapatra Tragic death story
ते मागे ठेवून गेले
त्यांची पत्नी रसमनजरी देवी या माजी आमदार आहेत. त्यांना तीन मुलगे आहेत. पण राजा ब्रजराजसिंह यांचे आयुष्य एक शोकांतिका ठरले.