लातूर : लातूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरचे महापालिका आयुक्त बाबासासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला, या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
त्यांनी आपल्या डोक्यात गोळी झाडली. मात्र त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला? हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाहीये. या प्रकरणात आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.
बाबासाहेब मनोहरे यांच्या नातेवाईकांनी केलेल्या दाव्यानुसार मनोहरे यांना कोणाचा तरी फोन आला होता, फोनवर बोलल्याननंतर त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली, आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान आता पोलिसांनी त्यांचा फोन जप्त केला आहे. मनोहरे हे आयफोन वापरत होते. मनोहरेंना कोणाचा फोन आला? समोरचा व्यक्ती फोनवर बोलला का? नेमकं काय संभाषण झालं याबाबत आता तपास केला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान बाबासाहेब मनोहरे यांची प्रकतीमध्ये काल थोडी सुधारणा दिसत होती, अशी माहिती देखील त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. मनोहरे यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबई विमानतळावर आणण्यात आलं आहे, त्यांना आता पुढील उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे. विमानतळापासून ते कोकिलाबेन रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. लातूरमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज त्यांना मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
लातूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला होता, या घटनेनं खळबळ उडाली. लातूरचे महापालिका आयुक्त बाबासासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लातूरमध्ये उपचार सुरू होते, मात्र त्यांना आता उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलं आहे, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये, त्यांच्यावर आता मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. पोलिसांनी त्यांचा फोन ताब्यात घेतला आहे.