By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 678 अंकांनी घसरला, 5 लाख कोटी बुडाले
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
लेटेस्ट न्यूज

शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 678 अंकांनी घसरला, 5 लाख कोटी बुडाले

admin
Last updated: 2025/02/04 at 3:44 AM
admin Published February 4, 2025
Share
SHARE

अर्थसंकल्पानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. आज सेन्सेक्स 678 अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टीतही 207 अंकांची घसरण झाली आहे. तसेच टाटा मोटर्स, टाटा स्टील, झोमॅटो, इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे.

त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमेरिकेच्या धोरणाचा परिणाम

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवरील कर वाढवण्याची घोषणा केली होती, त्यानंतर या देशांनी प्रत्युत्तरादाखल कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये घसरण होत आहे. अमेरिकन सरकारने कॅनडा आणि मेक्सिकोमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के आणि चिनी वस्तूंवर 10 टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे.

सेन्सेक्स 678 अंकांना कोसळला

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्यामुळे प्रमुख आशियाई शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येत आहे. आज सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 678 अंकांनी घसरून 76827 अंकांवर पोहोचला. त्याच वेळी एनएसई निफ्टी 207 अंकांनी घसरून 23274 अंकांवर पोहोचला. तसेच आज टाटा मोटर्स, टाटा स्टील, झोमॅटो, इंडसइंड बँकेतही मोठी घसरण दिसून येत आहे.

बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी रुपये बुडाले

बाजारातील प्रचंड घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे अवघ्या 5 मिनिटांत 5 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. गेल्या काही काळापासून गुंतवणूकदारांना सतत तोटा सहन करावा लागत आहे. बाजारातील मोठ्या घसरणीमुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदार निराश झाले आहेत. यामुळे बंद होणाऱ्या एसआयपी खात्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. कारण अनेकांनी आपले पैसे काढून घेतले आहेत.

आशियाई शेअर बाजारांमध्येही मोठी घसरण

व्यापार युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेसह जगभरातील बाजारपेठांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. जपानच्या निक्केई 225 निर्देशांकासह प्रमुख आशियाई निर्देशांक 2.27 टक्क्यांहून अधिक घसरले, तर हाँगकाँगच्या हँग सेंग निर्देशांकात 2.07 टक्क्यांनी घसरण झाली. तैवानच्या निर्देशांकात सर्वात मोठी 3.47 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. अनेकदा अमेरिकेच्या धोरणांचा आशियाई बाजारपेठांवर मोठा परिणाम होतो. त्यामुळेच आजही बाजारात मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे.

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर…

मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…

admin February 4, 2025 February 4, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आंतरराष्ट्रीयताज्या बातम्यास्टर मनी विश्लेषण

एखाद्या देशाने अणुबॉम्ब टाकला तर रेडिएशनपासून कसे वाचावे? जाणून घ्या …

admin admin May 8, 2025
‘या’ २ गोष्टींचा करा त्याग; यश तुमच्या मागे येईल धावत! भगवान श्रीकृष्ण म्हणतात…
4 वर्षात 1 लाखाचे झाले 76 लाख रुपये; ‘या’ इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअर्सचा 1 वर्षात हजार टक्के परतावा!
मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसाची कोठडी; काय काय घडलं?
What You Need to Know about Covid Delta Variant
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?