By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी मार्केट तोंडावर का आपटलं? ३ महत्त्वाची कारणे समोर
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > शेअर बाजार > अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी मार्केट तोंडावर का आपटलं? ३ महत्त्वाची कारणे समोर
शेअर बाजार

अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी मार्केट तोंडावर का आपटलं? ३ महत्त्वाची कारणे समोर

admin
Last updated: 2025/02/04 at 3:25 AM
admin Published February 4, 2025
Share
SHARE

केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मध्यमवर्गीय आनंदी आहे. मात्र, भारतीय शेअर बाजारात याच्या उलट परिणाम दिसत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ नंतर पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली.

 

सेन्सेक्स ७०० हून अधिक अंकांनी घसरून ७६,७७४.०५ च्या पातळीवर आला. तर निफ्टी देखील २३,३०० ची महत्त्वाची पातळी सोडून २३,२३९.१५ वर घसरला. जागतिक अनिश्चितता, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नवे शुल्क धोरण, कमकुवत रुपया आणि केंद्रीय अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधांवर होणारा माफक खर्च यामुळे ही घसरण होत आहे. हा दिवस गुंतवणूकदारांसाठी काळा सोमवार ठरला, कारण बाजारात सर्वत्र मंदीचे वातावरण आहे.

 

चीन, कॅनडा आणि मॅस्किकोवर नवे आयात शुल्क लागू
अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर कॅनडा, मॅक्सिको आणि चीनवर नवीन आयात शुल्क (टॅरीफ चार्ज) लादले आहे. या निर्णयानंतर जागतिक व्यापार युद्ध छेडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेने कॅनडा आणि मॅक्सिकोवर २५ तर चीनवर १० टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. यानंतर या देशांनी प्रतिउत्तर देण्याची धमकी दिली आहे. या निर्णयाला जागतिक व्यापार संघटनेत (डब्ल्यूटीओ) आव्हान देणार असल्याचे चीनने म्हटले आहे.

 

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर हात आखडता
केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर खर्च करताना सरकारने हात आखडता घेतला आहे. परिणामी गुंतवणूकदारांची निराशा झाली. त्यामुळे पायाभूत सुविधांशी संबंधित समभागांमध्ये मोठी विक्री दिसून आली. एल अँड टीचे समभाग ४.४२ टक्क्यांनी घसरले, तर अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग २ टक्क्यांनी आणि IRCON इंटरनॅशनलचे समभाग ५ टक्क्यांहून अधिक घसरले. अर्थसंकल्पातील भांडवली खर्चात कमी वाढ केल्यामुळे उद्योगविश्वात नाराजी पसरली आहे. या परिणाम शेअर बाजारावर झाला.

 

रुपयाची ऐतिहासिक घसरण
ट्रम्प यांनी आयात शुल्काची (टॅरिफ) घोषणा केल्यांतर आशियाई चलनांमध्ये घसरण पाहायला मिळाली. यात भारतीय रुपयाही सुटला नाही. रुपयाने डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळी गाठली. रुपया प्रति डॉलर ८७.०७ पर्यंत घसरला आहे. डॉलरला मजबूत मागणी असल्याने रुपया आणखी घसरण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे.

 

या सर्व घटनांचा परिणाम शेअर बाजार कोसळण्यात झाला. गुंतवणूकदारांसाठी हा एक आव्हानात्मक काळ आहे. कारण जागतिक व्यापार युद्धाची भीती, कमकुवत रुपया आणि बजेटमध्ये पायाभूत सुविधांवर कमी खर्च यामुळे बाजाराचा मार्ग अधिक कठीण झाला आहे. येत्या काळात बाजारात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे

 

You Might Also Like

4 दिवसात येणार सर्वात मोठे आर्थिक संकट, अब्जावधी डॉलर्स पणाला; भारताचे गणित बिघडणार …

डोनाल्ड ट्रम्प जिंकल्यास डॉलर आणि रुपयावर काय परिणाम होईल? RBIची आधीच तयारी सुरु

admin February 4, 2025 February 4, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
क्रिप्टोयशस्वी उद्योजकशेअर मार्केट

IPO GMP | एकदम स्वस्त आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड फक्त 24 रुपये, मोठ्या कमाईची संधी

admin admin November 3, 2024
अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे 7 मागण्या, दुसरी आणि सहावी मागणी मान्य होणार? अर्थसंकल्पापूर्वी …
पुणे स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; एकाचवेळी 23 जणांची नोकरी गेली
अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणारं खैरलांजी हत्याकांड; नेमकं काय घडलं होतं?
बीड घटनेला मराठा-ओबीसी रंग दिला जातोय? छगन भुजबळ यांचं विधान
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?