By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: आईने रचला भयानक कट, प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाला दगडाने ठेचलं …
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
आंतरराष्ट्रीयलेटेस्ट न्यूज

आईने रचला भयानक कट, प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाला दगडाने ठेचलं …

admin
Last updated: 2025/02/02 at 2:19 PM
admin Published February 1, 2025
Share
SHARE

आईनेच प्रियकराच्या मदतीने तरुण मुलाच्या खुनाचा कट रचल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. प्रियकराने दोन साथीदारांच्या मदतीने दगडाने ठेचून मुलाची हत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित तरुणाचा जीव वाचला असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

कराड तालुक्यातील वराडे येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणातील आरोपी आई आणि तिचा प्रियकर पुण्याच्या हवेली तालुक्याचे रहिवासी आहेत.

 

प्रशांत शेंडगे या 24 वर्षांच्या तरुणाची आई शोभा महादेव शेंडगे हिचे जयेंद्र गोरख जावळे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या अनैतिक संबंधांना प्रशांत वारंवार विरोध करत होता, त्यामुळे आई शोभाने तिचा प्रियकर जयेंद्र जावळे याच्या मदतीने प्रशांतचा खून करण्याचा कट रचला.

दारू पाजून मुलावर हल्ला

जयेंद्र जावळे याने त्याचे साथीदार सिद्धार्थ व्हावळे आणि अकबर शेख या दोघांना मदतीला घेऊन प्रशांतला रिक्षाने उंब्रजमधून वराडे येथील शेतात आणलं, त्याठिकाणी त्यांनी प्रशांतला दारू पाजली. तसंच दगडाने ठेचून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रशांतला जखमी अवस्थेमध्ये सोडून ते तिथून पसार झाले. पोलिसांनी प्रशांतला रुग्णालयात दाखल केले आणि तपासाला सुरूवात केली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वराडे गावाच्या हद्दीत सागवानच्या शेतामध्ये बुधवारी रात्री प्रशांत शेंडगे हा युवक जखमी अवस्थेत आढळला होता, त्यानंतर त्याला पोलिसांनी रुग्णालयात नेलं. सध्या प्रशांत याच्यावर उपचार सुरू आहेत.

शोभा महादेव शेंडगे (वय 38, रा. काटेपुरम चौक, पिंपळे गुरव, सांगवी, ता. हवेली, जि. पुणे) जयेंद्र गोरख जावळे (वय 40, रा. सांगवी, ता. हवेली. जि. पुणे) सिद्धार्थ विलास वाव्हळे (वय 25, रा. मातोश्रीनगर, वांगी रोड, परभणी), अकबर मेहबूब शेख (वय 25, रा. निकाळजे वस्ती, बाणेरगाव, बालेवाडी स्टेडियमजवळ, ता. हवेली) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. तर खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या प्रशांत महादेव शेंडगे (वय 24, मुळ रा. शिवडे, ता. कराड) याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर…

मोठी बातमी! अमेरिकेने केला भयंकर हवाई हल्ला, जगभरात खळबळ…

admin February 2, 2025 February 1, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
क्राईम

प्रेयसीच्या जळत्या सरणावर तरुणाची उडी; अन उपस्थितांनी …

admin admin June 10, 2025
पाकिस्तानविरुद्ध मोठा पुरावा सापडला; पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड निघाला पाक सैन्याचा माजी कमांडो
पाकिस्तान प्रेम पडलं महागात! तुर्की नागरिकांना गोव्यातील सुविधा बंद, भारताकडून एर्दोगन यांचा तीव्र निषेध ..
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर…
शेअर बाजारात जोरदार वाढ; सेन्सेक्स 575 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?