By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: देशातील या मंदिरात 99 लाख 99 हजार 999 मूर्त्या, एक कोटीसाठी फक्त एकच मूर्ती कमी का?; काय कारण?
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
लेटेस्ट न्यूज

देशातील या मंदिरात 99 लाख 99 हजार 999 मूर्त्या, एक कोटीसाठी फक्त एकच मूर्ती कमी का?; काय कारण?

admin
Last updated: 2025/01/31 at 1:07 PM
admin Published January 31, 2025
Share
SHARE

भारत हा अत्यंत अनोखा देश आहे. धार्मिकत्वाने भरलेला हा देश आहे. या देशात असंख्य मंदिर आहेत. जागोजागी देवळं आहेत. देशातील रहस्यमय मंदिरे आणि त्यांशी संबंधित कथा आपल्याला अनेक वेळा ऐकायला मिळतात, परंतु आज आम्ही ज्या मंदिराबाबत सांगणार आहोत ते अत्यंत खास आहे.

 

हे मंदिर इतके गूढ आहे की त्याचं रहस्य आजवर उलगडलेलं नाही.

अत्यंत खास असं हे मंदिर आहे. या मंदिरात 99 लाख 99 हजार 999 मूर्त्या आहेत. आता तुम्ही म्हणाल हे मंदिर कुठे आहे? कोणते मंदिर आहे? आणि इतक्या मूर्त्यांचं रहस्य काय आहे? हे मंदिर त्रिपुरा राज्याची राजधानी अगरतळापासून सुमारे 145 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिराचं नाव आहे ‘उनाकोटी’. या मंदिरात एकूण 99 लाख 99 हजार 999 दगडांच्या मूर्त्या आहेत, आणि त्यांचे रहस्य आजपर्यंत कोणालाही उलगडता आलेले नाही. उदाहरणार्थ, या मूर्त्या कोणत्या काळात आणि कोणत्या कारणासाठी बनविल्या, आणि त्यातले सर्वात मोठे गूढ म्हणजे एक कोटीमध्ये एक मूर्ती कमी का आहे? ‘उनाकोटी’ या नावाचा अर्थ ‘कोटीमध्ये एक कमी’ असा आहे, आणि याच मूर्त्यांच्या संख्येच्या कारणामुळे या स्थळाचे नाव ‘उनाकोटी’ पडले आहे.

 

मूर्त्या कशा झाल्या?

उनाकोटीला रहस्यमय स्थळ मानले जातं कारण हे एक पर्वतीय क्षेत्र आहे, ज्यात घनदाट जंगलं आणि दलदलीची क्षेत्रं आहेत. अशा परिस्थितीत जंगलाच्यामध्ये लाखो मूर्त्या कशा तयार केल्या गेल्या असाव्यात, कारण या कामात अनेक वर्षे लागू शकतात आणि त्या भागात तेव्हा कोणताही रहिवासी असावा असंही सांगितलं जातं. हा एक दीर्घकाळापासून संशोधनाचा विषय बनला आहे, परंतु अद्याप ठोस उत्तर मिळालं नाही.

 

एक कथा अशीही…

या मंदिरात दगडांवर उलगडलेल्या हिंदू देवी-देवतांच्या मूर्त्यांबद्दल अनेक पौराणिक कथा आहेत. त्यापैकी एक कथा भगवान शिवाशी संबंधित आहे. कथेनुसार, एकदा भगवान शिव आणि एक कोटी देवी-देवता कुठेतरी जात होते. रात्र होऊ लागल्यावर इतर देवी-देवता महादेवाला उनाकोटीमध्ये विश्रांती घेण्यास सांगतात. महादेव मान्य करतात, पण ते ही सांगतात की सूर्य उगवण्यापूर्वी सर्व देवी-देवता इथून निघून जातील. परंतु, सूर्य उगवल्यावर फक्त भगवान शिवच जागे होते, आणि इतर सर्व देवी-देवता झोपले होते. हे पाहून भगवान शिव रागावले आणि त्यांनी सर्व देवतांना शाप दिला आणि त्यांना दगड बनवले. त्यामुळे येथे 99 लाख 99 हजार 999 मूर्त्या आहेत, म्हणजे एक कोटीपेक्षा एक कमी.

भोलेनाथांच्या शापाव्यतिरिक्त दुसरी एक कथा आहे. कथेनुसार, कालू नावाच्या शिल्पकाराला भगवान शिव आणि माता पार्वतीसह कैलाश पर्वतावर जायचं होतं. पण ते शक्य नव्हतं. मात्र शिल्पकाराच्या हट्टीपणामुळे भगवान शंकराने त्याला एक संधी दिली – “जर एक रात्रीत एक कोटी देवी-देवतेच्या मूर्त्या बनवल्या तर मी तुम्हाला माझ्यासोबत कैलाश पर्वतावर घेऊन जाईन.”, असं भगवान शंकर म्हणाले. हे ऐकून शिल्पकाराने रात्रीपासून मूर्त्या बनवायवा सुरुवात केली. रात्रभर त्याने मूर्त्या बनवल्या.

 

पण सकाळी गणती केल्यावर एक मूर्ती कमी असल्याचं लक्षात येतं. आणि म्हणूनच भगवान शिव त्याला आपल्या सोबत कैलाश पर्वतावर घेऊन जात नाहीत. मान्यतेनुसार, तेव्हाच या मंदिराची स्थापना झाली आणि हे मंदिर ‘उनाकोटी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. उनाकोटी मंदिर भारतातील सर्वात गूढ मंदिरांपैकी एक मानलं जातं, आणि ते त्रिपुरा राज्याच्या अगरतला शहरापासून 145 किलोमीटर दूर आहे.

You Might Also Like

दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य…

पाकिस्तानमध्ये या व्यवसायाचं लायसन्स फक्त हिंदूंनाच मिळतं, दर वर्षी करतात कोट्यवधींची कमाई, नाव ऐकताच तुम्हालाही बसेल धक्का…

दूध आहे की विष? जामखेड १२०० लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त, महाराष्ट्रात खळबळ…

समुद्रातील किंग कोण? ते १४ देश…ज्यांच्याकडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता; यादीत भारत कितवा?

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

admin January 31, 2025 January 31, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
क्राईमस्टर मनी विश्लेषण

नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली ! धक्कादायक प्रकार काय ?

admin admin May 10, 2025
The States Braces for Protests Over New COVID Rules
राजकारणात होणार उलथापालथ! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार?
Best beaches in the UK for the Perfect Sandy Getaway
आयुष्यात शारीरिक संबंध का महत्त्वाचे आहेत?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?