By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: पटवून घेणार की भांडणार! जन्मतारखेवरून असं ओळखू शकाल; सूट होणारा जोडीदार
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > लेटेस्ट न्यूज > पटवून घेणार की भांडणार! जन्मतारखेवरून असं ओळखू शकाल; सूट होणारा जोडीदार
लेटेस्ट न्यूज

पटवून घेणार की भांडणार! जन्मतारखेवरून असं ओळखू शकाल; सूट होणारा जोडीदार

admin
Last updated: 2025/01/25 at 10:15 AM
admin Published January 25, 2025
Share
SHARE

लव्ह मॅरेज होणार की अ‍ॅरेंज मॅरेज असा प्रश्न अनेकांना सतावतो. अंकशास्त्रातून याचं उत्तर मिळू शकतं. लव्ह मॅरेज होणार की अ‍ॅरेंज मॅरेज, कोणता मूलांक असलेल्या व्यक्तीशी विवाह करणं योग्य आहे हे अंकशास्त्र सांगू शकतं.

मूलांक 1 : कोणत्याही महिन्यातल्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. या मूलांकाच्या व्यक्ती खूप प्रॅक्टिकल असतात; पण विवाह, प्रेमाच्या बाबतीत लाजाळू असतात. लहानपणापासून आवडणाऱ्या व्यक्तीला प्रपोझ करण्यासाठी या व्यक्ती खूप वर्षं लावतात; पण शेवटी विवाह त्यांच्यासोबतच करतात. या मूलांकाच्या व्यक्तींचा विवाह 2, 4, 6 या मूलांकाच्या व्यक्तीशी झाला तर तो फायदेशीर ठरतो. या मूलांकाचे जोडीदार 1 मूलांकाच्या व्यक्तीसाठी श्रेयस्कर ठरतात. त्यामुळे मूलांक 1 असलेल्या व्यक्तींनी हा मूलांक असलेल्या व्यक्तीशी विवाह करावा.

 

मूलांक 2 : कोणत्याही महिन्याच्या 2, 11 किंवा 20 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. या व्यक्ती खूप मूडी असतात. तसंच त्या स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारे असतात; पण प्रेम फार विचारपूर्वक करतात. या व्यक्ती सामान्यपणे लव्ह मॅरेज करतात. त्यांच्यासाठी 1, 3 किंवा 6 मूलांक असलेला जोडीदार चांगला ठरतो. त्यामुळे त्यांनी या मूलांकाच्या व्यक्तीशी विवाह करावा.

 

मूलांक 3 : महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. या व्यक्ती फार रोमँटिक नसतात. ते त्यांच्या जोडीदारावर डॉमिनेट करतात. त्यामुळे यांच्यासाठी 2, 6 किंवा 9 मूलांक असलेले पार्टनर योग्य ठरतात. त्यांचा विवाह या मूलांकाच्या व्यक्तीशी झाला तर जीवनातल्या सर्व समस्या संपुष्टात येऊ लागतात आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळायला सुरुवात होते.

 

मूलांक 4 : कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. बऱ्याच वेळा या व्यक्ती एकापेक्षा जास्त व्यक्तींशी रिलेशनशिपमध्ये असतात. लव्ह मॅरेज केल्यावरही विवाहबाह्य संबंधांमुळे विवाह मोडण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे या व्यक्तींसाठी 1, 2, 7 किंवा 8 मूलांक असलेला जोडीदार चांगला जीवनसाथी ठरू शकतो. या व्यक्तीनी या मूलांकाच्या व्यक्तीशी विवाह केल्यास फायदा होतो.

 

मूलांक 5 : महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. या व्यक्तींसाठी विवाहाकरिता कुटुंबाचं मत खूप महत्त्वाचं असतं. या व्यक्तींना लव्ह मॅरेज करायचं असेल तर त्या सर्वप्रथम कुटुंबाची सहमती मिळवतात. 5 आणि 8 मूलांक असलेल्या व्यक्ती एकमेकांचे चांगले जोडीदार ठरतात. तसंच लव्ह लाइफमध्ये चांगलं नातं निर्माण करण्यात यशस्वी होतात.

 

मूलांक 6 : कोणत्याही महिन्यात 6, 15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. या व्यक्ती खूप आकर्षक असतात. लोक यांच्याकडे पटकन आकर्षित होतात आणि त्यांना प्रपोझ करतात. या व्यक्तींचं जोडीदाराशी भावनिक नातं लवकर निर्माण होत नाही. या मूलांकाच्या व्यक्तींचं सर्वांशी चांगलं पटतं. ते कोणताही मूलांक असलेल्या व्यक्तीशी विवाह करू शकतात.

 

मूलांक 7 : तुमचा जन्म कोणत्याही महिन्यात 7, 25 किंवा 16 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 असलेल्या व्यक्ती तत्त्वज्ञानी असतात. त्या खूप दृढ निश्चयी असतात. एखादं काम हाती घेतलं की ते पूर्ण झाल्यावरच शांत होतात. 7 मूलांक असलेल्या व्यक्तींनी 1 किंवा 8 मूलांक असलेल्या व्यक्तीशी विवाह करावा. कारण या मूलांकाच्या व्यक्ती गंभीर असतात आणि अचूकपणे भावना ओळखू शकतात.

 

मूलांक 8 : ज्या व्यक्तींचा जन्म महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झालेला असतो, त्यांचा मूलांक 8 असतो. या मूलाकांच्या व्यक्ती गूढ स्वभावाच्या असतात. त्यांना कोणाची खुशामत करायला आवडत नाही. या मूलांकाच्या व्यक्तींनी विवाहासाठी 2, 3, 5, 6 या मूलांकाचा जोडीदार निवडावा.

 

मूलांक 9 : तुमचा जन्म महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 9 असतो. यांचं लव्ह लाइफ सामान्य असतं; पण जोडीदाराशी काही वेळा ताण वाढू शकतो. याचा परिणाम साहजिकच नात्यावर होतो; मात्र जसजसा काळ पुढे सरकतो, तसतशी स्थिती सुधारत जाते. या व्यक्तींनी 1, 3, 5, 6 या मूलांकाच्या व्यक्तीशी विवाह करावा.

 

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. स्टार मनी त्याची हमी देत नाही.)

You Might Also Like

दीड मिनिटाला एक; ६ तासांत ५८३ पुरुषांसोबत शरीरसंबंध, आगळा वेगळा विक्रम तरुणीला पडला महागात अन्…

भयंकर ! कार झाडाला धडकली, कारचे दोन तुकडे , एअरबॅग्ज फाटून तिघांचा जागीच मृत्यू …

पाकिस्तानला कर्ज दिल्यानंतर IMF चिंतेत, आता या 11 नवीन अटी लादल्या

मोठी बातमी ! देवस्थान जमिनीच्या व्यवहारांना ब्रेक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नोंदणी विभागाला निर्देश …

मोठी बातमी ! भारताचा पाकिस्तानवर पलटवार; लाहोर, सियालकोटमध्ये हल्ले, पेशावरमध्ये झाला स्फोट !

admin January 25, 2025 January 25, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
क्राईम

इंजिनीयर तरुणी बकऱ्या चरणाऱ्या आजोबासमोर भर रस्त्यात नग्न झाली आणि… पोरीचे कृत्य समजल्यावर आई बाप …

admin admin May 18, 2025
प्रेयसीसोबत संभाेग करताना आवश्यक गोष्टी कोणत्या आणि सुरुवात कशी करावी?
शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 678 अंकांनी घसरला, 5 लाख कोटी बुडाले
बेडरुममध्ये भाच्यासोबत होती मामी; अचानक मामा आला अन् घडल भयंकर …..
‘धर्मनिरपेक्ष समान नागरी कायदा’ लागू करणारच
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?