By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: दोन वर्षापूर्वी मेलेल्या बायकोचा डेटिंग अ‍ॅपवर मेसेज,बाहेर उभी आहे, आत तर घ्या,नवरा कोमात; असं कसं घडलं?
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
स्टर मनी विश्लेषण

दोन वर्षापूर्वी मेलेल्या बायकोचा डेटिंग अ‍ॅपवर मेसेज,बाहेर उभी आहे, आत तर घ्या,नवरा कोमात; असं कसं घडलं?

admin
Last updated: 2025/01/15 at 9:07 AM
admin Published January 15, 2025
Share
SHARE

एखादी व्यक्ती एकदा मेल्यावर पुन्हा दोन वर्षांनी जिवंत होऊ शकते? मृत व्यक्ती डेटिंग अ‍ॅपवर आपल्या कुटुंबियाशी चर्चा करू शकतो? तुम्हाला या प्रश्नांनी चक्रावलं असेल आणि या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही नाही म्हणूनच द्याल.

 

पण यूकेमधील एका व्यक्तीने डोकं सुन्नं करणारा एक दावा केला आहे. डेटिंग अ‍ॅप टिंडरवर त्याला त्याच्या बायकोचा मेसेज आला होता. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी त्याच्या बायकोचं कॅन्सरने निधन झालं होतं. बायकोचं निधन झाल्याने तो प्रचंड दुखात होता. या दु:खातून सावरण्यासाठीच त्याने आपली गोष्ट घोस्ट हंट पॉडकास्टवर त्याने शेअर केली. त्याचीही आपबिती सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे.

 

ब्रिटनच्या लंडनमध्ये राहणाऱ्या डेरेकच्या बायकोचं नाव एलिसन होतं. तिला सर्व्हाइकल कॅन्सर होता. त्यामुळे तिचा दोन वर्षापूर्वी मृत्यू झाला. एकेदिवशी टिंडरवर तिची प्रोफाईल पाहून मला धक्का बसल्याचं डेरेकने सांगितलं. त्या प्रोफाईलमध्ये अधिक माहिती नव्हती. पण त्याने कधीच पाहिले नव्हते असे तीन फोटो होते. या फोटोत एलिसन हसत होती. हे फोटो पाहून डेरेक प्रचंड घाबरला. तो इतका घाबरला की तो तीन दिवस झोपलाच नाही. त्यानंतर त्याने स्वत:लाच सावरण्याचा प्रयत्न केला. कुणी तरी बनावट अकाऊंट करून आपल्याशी मस्करी केली असावी अशी त्याने स्वत:चीच समजूत काढली.

 

बायकोचं भूत बेडरूमपर्यंत

डेरेकने पुढची गोष्ट सांगितली ती हादरून सोडणारीच आहे. एके दिवशी पहाटे 3.33 वाजता टिंडरवर त्याची पत्नी एलिसनचा मेसेज आला. Hey। असं तिने लिहिलेलं होतं. त्यावर डेरेकने विचारलं, माझ्या बायकोचा फोटो कुठून मिळाला? त्यावर पुढच्या 24 तासात एकही मेसेज आला नाही. त्यानंतर पुन्हा एक मेसेज आला. आता एलिसनने थेट विचारणा केली. तुम्ही घरी आहात का? असं तिने मेसेज करून विचारलं. मी बाहेर उभी आहे. मला आत घ्या, असंही या मेसेजमध्ये म्हटलं होतं. हा मेसेज पाहून डेरेक घाबरला. तो घाबरूनच बेडवर जाऊन झोपला. या मेसेजमध्ये तिने माझा डेरी म्हणून उल्लेख केला होता. फक्त तिच मला डेरी म्हणायची. कुणालाही माझं नाव डेरी आहे, हे माहीत नव्हतं, असा दावाही त्याने केला.

माफी मागितल्यावर गेली

डेरेक म्हणतो, थोड्यावेळाने बेडरूममध्ये कुणी तरी आल्याची जाणीव झाली. त्यावेळी मी प्रचंड घाबरलो. मी मेसेज केला की मला माफ कर. मी तुझ्यावर निरातिशय प्रेम करतो. तुला जाऊन दोन वर्ष झालीत. तुझी खूप आठवण येते. मला आता पुढे जायचं आहे, असं मी या मेसेजमध्ये म्हटलं. त्यानंतर बेडरूममधून कोणी तरी बाहेर गेल्याचं मला जाणवलं. थोड्यावेळाने टिंडरवरून एलिसनचं अकाऊंटही गायब झालं. हे कसं झालं. याची मला काहीच गंधवार्ता नाही, असंही तो म्हणाला.

 

( वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

You Might Also Like

दूध आहे की विष? जामखेड १२०० लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त, महाराष्ट्रात खळबळ…

समुद्रातील किंग कोण? ते १४ देश…ज्यांच्याकडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता; यादीत भारत कितवा?

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

भारतातील एकमेव राज्य, जे इंग्रजांना कधीच जिंकता आले नाही…

TAGGED: Viral
admin January 15, 2025 January 15, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
करकर्जक्रिप्टोटेक-गॅजेटडिमॅट खातेबँकम्युच्युअल फंडयशस्वी उद्योजकलाईफस्टाईललेटेस्ट न्यूजशेअर मार्केटस्कॉलरशिप

दिवाळीपूर्वी मिळेल छप्परफाड परतावा; ‘या’ पाच शेअरची करा खरेदी. ॲक्सिस डायरेक्टचा सल्ला

starmoney starmoney October 20, 2024
‘हृदयविकार अन् स्ट्रोक’ बरे करणार योग अन् आयुर्वेद? संशोधनातून खुलासा …
भारताचा ‘हा’ प्लेबॉय राजा इंदिरा गांधींमुळे दरिद्री झाला अन् एका झोपडीत मेला
Apple iMac M1 Review: the All-In-One for Almost Everyone
पूल तुटला, आरडाओरडा अन् किंकाळ्या, ४० जणांचा मृत्यू…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?