महाकुंभानंतर नागा साधू कुठे जातात? असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. मात्र या प्रश्नाचे उत्तर एका रूद्राक्ष धारण केलेल्या चैतन्य गिरी बाबांनी दिले. त्यांनी सांगितले की, महाकुंभच्या समाप्तीनंतर नागा साधू कुठे जातात.
(Mahakumbh Mela 2025)
भारतवर्षात महाकुंभमेळ्याला महत्वाचे स्थान आहे. या कुंभमेळ्यात सामील होणारे साधू, संत, नागा साधू यांच्या विषयी सर्वसामान्यांमध्ये कुतूहल असते. कुंभमेळ्यात येणारे नागा साधू इतरवेळी कुठे जातात हा प्रश्न आपल्या सर्वांना नेहमी पडत असतो. त्याचे उत्तर महाकुंभ मेळ्यात आलेल्या चैतन्य गिरी बाबांनी दिले. ते म्हणाले, कुंभ मेळ्यानंतर काही नागा हिमालयात जातात. काही नागा साधू हे सातपुडाला निघुन जातात. काही द्रोणागिरीकडे निघुन जातात तर काही नागा हे किष्किंधाकडे जातात.
रूद्राक्ष बाबा म्हणाले…
रूद्राक्ष बाबा चैतन्य गिरींनी सांगितले की, नागा फौज सनातनी आहे. उन्हाळा, पावसाला आणि हिवाळा हे तीन ऋतु आहेत. तीन्ही ऋतुंसाठी समान भावाता जा. आपल्या आतही तशीच रचना आहे. कोणी तपस्या करत आहे, कोणी नोकरी करत आहे, कोणी झाडू मारत आहे.
रूद्राक्ष बाबा चैतन्य गिरी यांनी आपल्या वेशभुषेवर सांगितले की, हे वस्त्र आमची आभुषणे आहेत. ज्या प्रकारे तुम्ही पँट-शर्ट परिधान करता, तसेच नागा साधूंचे वस्त्र आहेत. देवतांच्या काळात कार्तिकेयला सेनापती बनवण्यात आले होते, गणेशजींना गणाध्यक्ष बनवण्यात आले होते, शनि देवाला न्याय देवता बनवण्यात आले होते, त्याच प्रकारे नागा या भूमीचे पूत्र आहेत. मन चंचल आहे. मन चंद्र आहे.
आणखी एका नागा बाबांनी सांगितले की, संपूर्ण त्याग करा. तेंव्हाच भक्ती मार्गात संपूर्णता येईल. मानवाच्या मनात हा भाव तेंव्हाच येतो जेंव्हा कोणतीतरी परिस्थिती येते. जशी कोणत्याही एका देवाची ओळख असते आणि ते विशेष वस्त्र परिधान करतात. त्याच प्रकारे नागा साधूंचे वस्त्र हे भस्म असते. भगवान शंकराचा श्रुंगार हा भस्माने होतो.
नागा साधू नग्न का राहतात? महंत आशुतोष गिरींनी सांगितले
महंत आशुतोष गिरी यांनी सांगितले की, आखाड्याचे नियम आहेत. बाळ जसे जन्म घेते, त्याच प्रकारे आखाड्यात यायचे असते. त्यासाठी साऱ्या संसाराचा त्याग करावा लागतो. सर्वांचे पिंडदान करण्यात येते. आमचे १७ पिंडदान असतात. ज्यामध्ये ८ जन्माच्या आधीचे आणि ८ जन्मानंतरचे असतात. यातील एक पिंडदान स्वत:चे असते. तो जगासाठी मृत झालेला असताे.



