By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एंट्री, पाहा कुठे सापडले कीती रुग्ण
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > आंतरराष्ट्रीय > HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एंट्री, पाहा कुठे सापडले कीती रुग्ण
आंतरराष्ट्रीय

HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एंट्री, पाहा कुठे सापडले कीती रुग्ण

admin
Last updated: 2025/01/08 at 1:46 AM
admin Published January 8, 2025
Share
SHARE

नागपूर: HMPV म्हणजेच ह्युमन मेटान्यूमो व्हायरसची प्रकरणे भारतात वाढतच आहेत. ताज्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, देशात आतापर्यंत 7 लोक या विषाणूचे बळी ठरले आहेत.

दरम्यान, आता या व्हायरसने महाराष्ट्रातही धडक दिली आहे. या व्हायरसचे दोन रुग्ण हे नागपुरात आढळून आले आहेत.

दरम्यान, आतापर्यंत तीन राज्यांमध्ये HMPV रुग्णांची पुष्टी झाली आहे. तथापि, केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, रुग्णांमध्ये वाढ झाली तरी कोविडसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. 2001 मध्ये नेदरलँडमध्ये पहिल्यांदा हा विषाणू आढळला होता.

 

रुग्ण कुठे सापडले?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी भारतात HMPV च्या 7 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी बंगळुरू, नागपूर आणि तामिळनाडू मध्ये प्रत्येकी 2 आणि अहमदाबादमध्ये 1 रुग्ण आढळून आला. ICMR ने बंगळुरू येथील बॅप्टिस्ट हॉस्पिटलमध्ये दोन रुग्णांची पुष्टी केली आहे. देशातील HMPV चा पहिला रुग्ण हा बंगळुरूमध्ये आढळून आला होता. 3 वर्षांच्या मुलीला डिसेंबरमध्ये ताप आणि थंडी वाजत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिला HMPV ची लागण झाल्याचं समोर आलं होतं. मात्र, त्यातून ती पूर्णपणे बरी झाली असून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

दुसरा रुग्ण हा 3 जानेवारी रोजी आढळून आला, ज्यामध्ये 8 महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. या दोन्ही मुलांना यापूर्वी ब्रॉन्कोन्यूमोनियाचा त्रास झाला होता आणि त्यांनी परदेशात प्रवास केला नव्हता. 24 डिसेंबर रोजी राजस्थानमधील डुंगरपूर येथील एका 2 वर्षाच्या मुलाला अहमदाबादमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 26 डिसेंबर रोजी त्याला HMPV झाल्याचं समोर आलं होतं.

 

नागपूरमध्ये HMPV चे दोन रुग्ण सापडले

तर 3 जानेवारी रोजी नागपूरमध्ये 7 आणि 13 वर्षांच्या दोन मुलांना नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्यांना HMPV ची लागण झाली आहे. विशेष म्हणजे नागपूर महापालिकेने या दोन्ही रुग्णांची एम्समध्ये पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, दोन्ही मुले बरी असल्याचं समोर आलं आहे.

 

काळजी करण्याची गरज नाही – सरकार

केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी सोमवारी सांगितले की, सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि काळजी करण्याचे कारण नाही. ते म्हणाले की HMPV हा नवीन विषाणू नाही आणि देशात कोणत्याही सामान्य श्वसन विषाणू रोगजनकात वाढ झालेली नाही. एका व्हिडिओ संदेशात नड्डा म्हणाले की, चीनमधील HMPV च्या अलीकडील बातम्या पाहता, आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर, देशातील सर्वोच्च आरोग्य संशोधन संस्था आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) चीन आणि इतर शेजारी देश येथील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

ते म्हणाले की, ‘WHO ने परिस्थितीची दखल घेतली आहे आणि लवकरच अहवाल आमच्याशी शेअर केला जाईल. आयसीएमआर आणि इंटिग्रेटेड डिसीज सव्र्हेलन्स प्रोग्रामकडे उपलब्ध असलेल्या श्वसन विषाणूंबाबत देशातील डेटाचेही पुनरावलोकन केले गेले आहे आणि भारतात कोणत्याही सामान्य श्वसन विषाणू रोगजनकांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले नाही.’

 

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, 4 जानेवारी रोजी आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या (DGHS) अध्यक्षतेखाली संयुक्त देखरेख बैठक झाली. ते म्हणाले, ‘देशातील आरोग्य यंत्रणा आणि पाळत ठेवणारे नेटवर्क कोणत्याही उदयोन्मुख आरोग्य आव्हानाला तत्परतेने प्रतिसाद देण्यासाठी तयार राहतील. काळजी करण्याची गरज नाही, आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.’

 

You Might Also Like

Video : ग्लेशियर फुटून अख्खं गाव बर्फाखाली गाडलं, अनेक घरं उद्ध्वस्त तर काही वाहून गेली

मोठी बातमी ! पाकिस्तानने युद्धविराम तोडला, जम्मूत पुन्हा ब्लॅकआऊट ..

भारताने पाकिस्तानच्या ‘या’ ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या …

मोठी बातमी ! जम्मू विमानतळावर रॉकेट हल्ला, 8 – 10 ठिकाणी स्फोटाचे आवाज …

पाकिस्तान प्रेम पडलं महागात! तुर्की नागरिकांना गोव्यातील सुविधा बंद, भारताकडून एर्दोगन यांचा तीव्र निषेध ..

TAGGED: HMPV व्हायरस
admin January 8, 2025 January 8, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
क्राईम

रॉड, कत्ती, बेल्ट, काठीने शिवराजला मारणारे 7 जण कोण? सगळ्या आरोपींची नावं, खळबळजनक …

admin admin May 18, 2025
भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद …
दिवाळी अगोदर सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावर; चांदीही 1,000 रुपयांनी वाढली, भाववाढीचे कारण काय?
“…तर जमीन परत द्यावी लागणार”; वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीशीवर AIMIM आमदाराचे विधान
जितकं उपाशी राहू तितकं शरीर स्वतःलाच खातं! अभ्यासाचा दावा – ऑटोफॅगी म्हणजे काय?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?