By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: ‘धर्मनिरपेक्ष समान नागरी कायदा’ लागू करणारच
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
राष्ट्रीय

‘धर्मनिरपेक्ष समान नागरी कायदा’ लागू करणारच

admin
Last updated: 2024/12/16 at 8:20 AM
admin Published December 16, 2024
Share
SHARE

‘देशात समान नागरी कायदा लागू असावा, असे स्पष्ट मत घटनाकारांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे देशात ‘धर्मनिरपेक्ष समान नागरी कायदा’ लागू करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत,’ अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी शनिवार, दि. १४ डिसेंबर रोजी लोकसभेत दिली.

 

भारतीय संविधान लागू होण्याच्या ७५व्या वर्षानिमित्त आयोजित लोकसभेतील विशेष चर्चेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी आपल्या सुमारे दोन तासांच्या संबोधनाद्वारे उत्तर दिले. ते म्हणाले की, ‘देशात ‘समान नागरी कायदा’ असावा, असे मत घटनाकारांनी दीर्घ आणि सर्वंकष चर्चेद्वारे व्यक्त केले होते. लोकनियुक्त सरकारने समान नागरी लागू करावा, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.’ घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘धार्मिक आधारावरील वैयक्तिक कायदे रद्द व्हावे,’ असे मत व्यक्त केले होते. त्याचप्रमाणे, के. एम. मुन्शी यांनीदेखील ‘राष्ट्राची एकता आणि आधुनिकतेसाठी ‘समान नागरी कायदा’ आवश्यक आहे,’ असे मत व्यक्त केले होते. ‘सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी तसे निर्देश दिले आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी देशात धर्मनिरपेक्ष ‘समान नागरी कायदा’ लागू करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत,’ अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

 

पं. नेहरूंपासून काँग्रेसमधील एका कुटुंबाने भारतीय संविधानास धाब्यावर बसविण्याचे धोरण ठेवल्याचा घणाघात पंतप्रधानांनी केला. ते पुढे म्हणाले की, ‘स्वातंत्र्यानंतर स्वार्थी आणि विकृत मानसिकतेमुळे देशाच्या ‘विविधतेत एकता’ या मूळ भावनेस चिरडण्यास प्रारंभ झाला. लोकनियुक्त सरकार नसताना आणि संविधान नुकतेच लागू झाले असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारी पहिली घटनादुरुस्ती पं. नेहरूंनी केली. तेव्हापासूनच काँग्रेसच्या तोंडास मनमानी पद्धतीने वैयक्तिक स्वार्थासाठी संविधान बदलण्याचे रक्त लागले.’

‘नेहरूंनंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. मनमोहन सिंग आणि पुढील पिढीनेही संविधानाचा अपमान करण्याची एकही संधी सोडलेली नाही. सत्तेसाठी घटनाकारांनी नाकारलेल्या धार्मिक आरक्षणाचा घाट काँग्रेस पक्षातर्फे आपली सत्तेची भूक भागविण्यासाठी घातला जात आहे. मात्र, देशातील दलित, वनवासी आणि ओबीसींच्या आरक्षणावर घाला घालणार्‍या या मनसुब्यास आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार नाही,’ असा इशाराच पंतप्रधानांनी आपल्या भाषणात दिला.

 

देशासाठी ११ संकल्प महत्त्वाचे

नागरिक आणि सरकारने कर्तव्यांचे पालन करणे.

सर्व समाजास विकासाचा लाभ पोहोचविणे.

भ्रष्टाचाराविरोधात झिरो टॉलरन्स.

देशाचे कायदे, नियम, परंपरांविषयी अभिमान.

गुलामीची मानसिकता सोडणे, आपल्या वारशाचा अभिमान.

घराणेशाहीमुक्त राजकारण.

संविधानाचा सन्मान, राजकीय स्वार्थासाठी वापर होऊ न देणे.

विद्यमान आरक्षणास धक्का न लावणे, धार्मिक आरक्षणाच्या प्रयत्नांचा तीव्र विरोध.

महिला नेतृत्वाखाली विकास.

राज्यांच्या विकासातून राष्ट्रविकास.

‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ भावनेवर विश्वास

 

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली सर्वात मोठी ऑफर, रशियावर होणार थेट परिणाम…

2026 मध्ये गुंतवणूकदारांसाठी ‘ही’ गुंतवणूक ठरणार तारणहार, सोन की शेअर मार्केट कुठून मिळणार जास्त रिटर्न ?

बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? सगळं ठरलं, मोठी अपडेट समोर !

TAGGED: Narendra Modi
admin December 16, 2024 December 16, 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
धार्मिक

‘या’ २ गोष्टींचा करा त्याग; यश तुमच्या मागे येईल धावत! भगवान श्रीकृष्ण म्हणतात…

admin admin December 16, 2024
भारतीय सैन्याचा ‘त्रिशूल’ आणि हाफिज सईद घाबरला; लाहोरमध्ये होणारी परिषद पुढे ढकलली….
संतोष देशमुख हत्येप्रकरणी फरार असलेल्या कृष्णा आंधळेबद्दल आमदाराचा मोठा खुलासा, म्हणाला “24 तासात.”
बीडमध्ये संतापजनक घटना! ‘लक्ष्मी देवी’ मूर्तीची विटंबना; दगडाने मूर्तींची तोडफोड, अज्ञात आरोपी मोकाट!
F-47 : जगातील सर्वात घातक अस्त्राच्या निर्मितीची घोषणा, ‘कोणी आसपास पण फिरकरणार नाही’
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?