By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: मेहुणीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने दाजीने केली हत्या! मुंडके कापून फेकले …
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
क्राईम

मेहुणीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने दाजीने केली हत्या! मुंडके कापून फेकले …

admin
Last updated: 2024/12/16 at 2:17 AM
admin Published December 16, 2024
Share
SHARE

पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचं प्रकरण ताज असतांना आता आणखी एक भयंकर हत्याकांड उघडकीस आले आहे. दक्षिण कोलकात्यातील टॉलीगंज भागात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका महिलेचे कापलेले मुंडके आढळून आले.

या महिलेच्या हत्येप्रकरणी २४ तासांच्या आत महिलेच्या दाजीला तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

 

अतिउर रहमान लास्कर असे आरोपी दाजीचे नाव आहे. त्याने मेहुणीशी शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिने शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने त्याने तिची हत्या केली. एवढेच नाही तर तिचे मुंडके कापून ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले. कोलकाता पोलिसांनी त्याला दक्षिण २४ परगण्यातील डायमंड हार्बरमधील बासुलडांगा या मूळ गावातून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजूर असलेल्या लस्कर याने गेल्या दोन वर्षांपासून पतीपासून वेगळे राहणाऱ्या त्याच्या मेहुणीची हत्या केल्याची कबुली दिली. डीसीपी (दक्षिण उपनगर) बिदिशा कलिता यांनी सांगितले की, शुक्रवारी ग्रॅहम रोडजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका महिलेचे कापलेले मुंडके आढळले होते. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तपासाला सुरवात करत शनिवारी रिजेंट पार्क परिसरातील तलावाजवळ महिलेचे धड आढळले.

 

ही महिला रिजंट पार्कमधील एका घरात कामाला होती. टॉलीगंजमध्ये काम करणाऱ्या लास्कर यांच्यासोबत ती रोज कामाला जायची. आरोपी दाजीला तिच्याशी शरीर संबंध ठेवायचे होते. मात्र, याला तिने नकार दिला. यामुळे संतापलेल्या आरोपीने तिची हत्या केली. आठवडाभरापूर्वी खून झालेल्या मेहुणीने आरोपी दाजीपासून लांब राहण्यास सुरुवात केली होती. यामुळे तो अधिकच संतपला होता. महिलेने त्याचा फोन नंबरही ब्लॉक केल्याने त्याच्या रागाचा पारा चढला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी ती कामावरून घरी परत जात असतांना त्याने तिला जबरदस्तीने एका निर्माणाधीन इमारतीत नेले. या ठिकाणी त्याने तिचा गळा दाबून खून केला आणि नंतर तिचे डोके कापले. त्याने मृतदेहाचे तीन तुकडे करून फेकून दिले.

या प्रकरणी इतर कुणाची मदत आरोपीने घेतली का ? याचा तपास केला जात आहे. परिसरात कापलेले डोके सापडल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. तसेच भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते.

 

पोलिसांना सापडले मुंडके

शुक्रवारी सकाळी गोल्फ ग्रीन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्रॅहम रोडवरील टाकीत एका पिशवीत एका महिलेचे मुंडके असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच थोड्या वेळानंतर या मृतदेहाचा इतर भाग सापडल्यानंतर पोलिसांनी पुढील तपासासाठी मृतदेह हा एमआर बांगुर रुग्णालयात पाठवला.

 

कापलेले मुंडके काचऱ्याच्या ढिगाऱ्यात कोणी टाकले हे शोधण्यासाठी कोलकाता पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले. घटनास्थळाशी संबंधित नमुने देखील जप्त करण्यात आले.

कापलेल्या डोक्यावर जखमा आणि रक्ताचे डाग देखील होते, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्यावरून हा खून १२ तासांच्या आत झाला असावा, असे निष्पन्न झाले. मृतदेहाचा इतर भाग शोधण्यासाठी पोलिसांनी स्निफर डॉगची मदत घेतली. कुत्र्याने पोलिसांना ग्रॅहम रोड टाकीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील एका अपार्टमेंटपर्यंत माग काढला. यावेळी आरोपी हा महिलेचा मेहुणा असल्याचं निष्पन्न झालं. त्याला अटक करण्यात आली आहे.

You Might Also Like

दूध आहे की विष? जामखेड १२०० लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त, महाराष्ट्रात खळबळ…

लपून नग्न फोटो काढला अन् लग्नाच्या घरीच रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं?

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट! हाय अलर्ट जारी, दहशतवादी कटाचा संशय…

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे.. 55 वर्षांच्या दाजीशी 18 वर्षांच्या मेहुणीचे लग्न, तरुणी म्हणते- म्हातारा नाही, सुंदर आहे पती!

चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले ….

TAGGED: राष्ट्रीय
admin December 16, 2024 December 16, 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
महाराष्ट्रलेटेस्ट न्यूजस्टर मनी विश्लेषण

३२ टक्के आरक्षणातील सर्व प्रवर्ग रद्द करा : मनोज जरांगे- पाटील

admin admin September 13, 2025
शेअर बाजारात जोरदार वाढ; सेन्सेक्स 575 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?
Hidden Ways To Save Money That You Might Be Missing
The States Braces for Protests Over New COVID Rules
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत महत्वाचे संकेत, पुन्हा रॉकेट तेजीने कमाई होणार- NSE: IREDA
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?