मागील वर्षभरात अनेक IPO मार्फत गुंतवणूकदारांनी मोठी कमाई केली आहे. आयपीओ गुंतवणूकदारांसाठी अजून एका आनंदाची बातमी आहे. लवकरच आणखी एक एसएमई आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.
नीलम लिनन अँड गारमेंट्स (इंडिया) लिमिटेड कंपनी आयपीओ लाँच करणार आहे.
नीलम लिनन अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनी IPO ८ नोव्हेंबर २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि १२ नोव्हेंबरला बंद होईल. नीलम लिनन अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनीने आपल्या आयपीओसाठी २० ते २४ रुपये प्राईस बँड निश्चित केला आहे. नीलम लिनन अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये १३ कोटी रुपयांच्या एकूण ५४.१८ लाख इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू (Fresh Issue) करण्यात येणार आहे. या आयपीओमध्ये ऑफर फॉर सेल घटक नाही.
काय आहे कंपनीचा प्लॅन
नीलम लिनन अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनी आयपीओमधून जमा झालेल्या निधीचा वापर भरतकाम मशीन खरेदी सारख्या भांडवली खर्चासाठी, कर्ज फेडण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट खर्चासाठी करणार आहे. एक्स्पर्ट ग्लोबल कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड हे नीलम लिनन अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनी आयपीओचे लीड मॅनेजर आहेत, तर पूर्वा शेअररजिस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रार आहेत.
आयपीओ तपशील
नीलम लिनन अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनी आयपीओसाठी किरकोळ गुंतवणूकदार किमान एका लॉट आकारासाठी अर्ज करू शकतात, ज्यात 1,44,000 रुपये किंमतीच्या 6,000 शेअर्सचा समावेश आहे. उच्च नेटवर्थ असलेल्या गुंतवणूकदारांसाठी कमीत कमी लॉट आकार दोन आहे, ज्याची किंमत 288,000 रुपये आहे.
नीलम लिनन अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनी आयपीओचा अर्धा भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, १५% बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि ३५% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. नीलम लिनन अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर्सचे वाटप १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. नीलम लिनन अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनी आयपीओ १८ नोव्हेंबर रोजी एनएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कंपनी बद्दल
महाराष्ट्र स्थित नीलम लिनन अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनी ही सॉफ्ट होम फर्निशिंग फर्म आहे. नीलम लिनन अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए), ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये जागतिक ग्राहकांना आपली सेवा प्रदान करते. तसेच किरकोळ दुकानांसाठी बेडशीट, ड्युवेट कव्हर, उशी कव्हर, टॉवेल, डोहर, रग, शर्ट आणि कपडे तयार करण्याचे काम सुद्धा नीलम लिनन अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनी करते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस स्टार मनी जबाबदार राहणार नाही.