शेअर बाजार आज बंद असला तरी दरवर्षीप्रमाणे आज संध्याकाळी मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. त्यासाठी सहा ते सात वाजेच्या दरम्यान एक तास बाजार सुरू राहणार असून या वेळेत शेअर्सचे व्यवहार करता येणार आहेत.
या खास मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी मार्केट एक्सपर्ट्सनी पाच खास स्टॉक्स सुचवले आहेत.
चॉइस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमित बागडिया आणि आनंद राठीचे गणेश डोंगरे यांनी गुंतवणूकदारांसाठी काही शेअर्सची शिफारस केली आहे. त्यात क्रिसिल, फोर्टिस हेल्थकेअर, नॅटको फार्मा, चंबल फर्टिलायझर्स आणि सन फार्मा या शेअर्सचा समावेश आहे.
सुमीत बागडिया यांचा सल्ला
क्रिसिल : हा शेअर५४७४.७५ रुपयांवर खरेदी करा. ५८५० रुपयांचे टार्गेट ठेवताना ५२८० रुपयांवर स्टॉप लॉस लावायला विसरू नका. क्रिसिलचा दैनंदिन चार्ट पुढील आठवड्यात सातत्यपूर्ण वाढीचा संकेत देत आहे, असं बागडिया यांनी म्हटलं आहे.
फोर्टिस हेल्थकेअर : ६६५ रुपयांचं टार्गेट ठेवून हा शेअर ६२४.७० रुपयांना खरेदी करा. खरेदी करताना ६०० रुपयांचा स्टॉपलॉस लावायला विसरू नका. फोर्टिसचे शेअर्स सध्या ६४२.७ रुपयांवर आहेत आणि जोरदार तेजी दाखवत आहेत. हा शेअर आणखी वरच्या दिशेनं जाण्याची शक्यता आहे. अल्प मुदतीत हा शेअर चांगला नफा देऊ शकतो.
गणेश डोंगरे यांची शिफारस
नॅटको फार्मा : नॅटको फार्मा १४५० रुपयांच्या टार्गेटसह १४०२ रुपयांना खरेदी करा. स्टॉपलॉस १३६५ रुपये ठेवायला विसरू नका. नॅटकोला १३६५ वर पुरेसा सपोर्ट आहे. सध्या १४०२ रुपयांवर असलेल्या या शेअरनं किमतींमध्ये बरेच चढउतार दाखवले आहेत. वाढीचा वेग कायम ठेवण्याची या शेअरची क्षमता आहे. हा स्टॉक खरेदी करून होल्ड करता येईल.
चंबल फर्टिलायझर्स : हा शेअर४८४ रुपयांना खरेदी करा, ४९८ रुपयांचे टार्गेट ठेवा आणि ४७५ रुपयांवर स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका. तांत्रिक पॅटर्ननुसार शेअरच्या किमतीत तात्पुरती घसरण होण्याची शक्यता आहे. मात्र, नंतर तो ४९८ रुपयांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे.
सन फार्मा : सन फार्मा १८५८ रुपयांवर खरेदी करून १९०० रुपयांचं टार्गेट ठेवा. १८४० रुपयांचा स्टॉप लॉस लावायला विसरू नका. दैनंदिन चार्टवर १८५८ च्या पातळीवर ब्रेकआऊट दिसून आला आहे, जो संभाव्य वाढीचा कल दर्शवितो. या ब्रेकआऊटला सामोरे जाताना रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (आरएसआय) अजूनही वाढत असून, खरेदीचा वेग वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. हे तांत्रिक निर्देशांक लक्षात घेता, डिप्सवर खरेदी करण्याचा विचार केला जाऊ शकतो.
(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. यातील तज्ज्ञांची मते त्यांची वैयक्तिक आहेत, हिंदुस्तान टाइम्स मराठीची नाहीत. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)