गुरुवारी स्टॉक मार्केट बेंचमार्क निर्देशांक पुन्हा लाल चिन्हावर बंद झाला होता. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स ५५३.१२ अंकांनी घसरून ७९,३८९.०६ वर बंद (NSE: IREDA) झाला होता. तसेच स्टॉक मार्केट निफ्टी 50 135.50 अंकांनी घसरून 24,205.35 च्या पातळीवर बंद झाला होता.
(इरेडा लिमिटेड कंपनी अंश)
शेअरची सध्याची स्थिती
गुरुवारी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअर ०.०५ अंकांनी घसरून 209.70 रुपयांवर बंद झाला होता. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चस्तर 310 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 49.99 रुपये होता. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 56,454 कोटी रुपये होते.
शेअर टार्गेट प्राईस
ईटी नाऊ वृत्तवाहिनीशी बोलताना स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सांगितले की, ‘मागील काही दिवसांपासून इरेडा शेअरवर विक्रीचा दबाव आहे. मात्र, ओव्हरसोल्ड टेक्निकल पॅरामीटर्समुळे बाईंग झोन तयार झाला आहे. प्राईस चार्टनुसार शॉर्ट टर्म मध्ये तेजीचे संकेत दिसत आहेत. इरेडा शेअरला 219 ते 220 रुपयांवर सपोर्ट झोन आहे. त्यामुळे तज्ज्ञांना रिकव्हरीची अपेक्षा आहे. पुढील २ ते ३ महिन्यांत हा शेअर 250 ते 260 रुपये पर्यंत वाढू शकतो. मात्र गुंतवणूकदारांनी 175 रुपये स्टॉपलॉस ठेवावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ६ महिन्यात या शेअरने 15.60% परतावा दिला आहे. तसेच मागील १ वर्षात या शेअरने 249.50% परतावा दिल आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 234.18% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस स्टार मनी जबाबदार राहणार नाही.