दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर मुहूर्त ट्रेडिंगचे विशेष सेशन राबवले जाते. बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर बाजारांमध्ये मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केले जाते.
यंदाच्या दिवाळीत तिथीत झालेल्या बदलामुळे हे ट्रेडिंग 31 ऑक्टोबरला होणार की 1 नोव्हेंबरला होणार, याबद्दल अनेकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे यावेळी मुहूर्त ट्रेडिंग नेमकी कधी होणार? आणि त्यादिवशी नेमके कोणते स्टॉक्स फायदेशीर ठरणार, हे जाणून घेऊया.
कधी आहे मुहूर्त ट्रेडिंग?
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग साधायचा बऱ्याच गुंतवणूकदारांचा प्रयत्न असतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केलेली गुंतवणुक शुभ मानली जाते. संपूर्ण वर्षात भरभराट या दिवशी ट्रेडिंग केल्याने मिळते, असा समज आहे. यावेळी लक्ष्मीपूजनाविषयी अनेक संभ्रम लोकांमध्ये आहेत. तिथीत झालेल्या बदलामुळ 31 तारीख की 1 नोव्हेंबर लक्ष्मीपूजन आणि मुहूर्त ट्रेडिंग नक्की कोणत्या दिवशी होईल या संभ्रमाचे स्पष्टीकरण एनएससी आणि बीएससीने एक सर्क्युलर काढून दिले आहेत. यामध्ये 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7 वाजता मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना या दिवाळीला मुहूर्त ट्रेडिंगला मोठी संधी आहे. बऱ्याच स्टॉक मध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये जवळपास सात ते आठ टक्क्यांची पडझड नोंद झाली आहे. तर स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये साधारण 10 ते 12 टक्क्यांची पडझड झाली आहे. मुहूर्त ट्रेडिंगसाठी कोणत्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करावी?, हे जाणून घेऊयात.
डी मार्ट म्हणजेच अवेन्यू सुपर मार्ट :
डी मार्ट या कंपनीचा शेअर 5400 वरून 3980 पर्यंत म्हणजेच 26% ची पडझड गेल्या काही महिन्यात या शेअरमध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात डी मार्ट म्हणजेच अवेन्यू सुपर मार्ट हा शेअर गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा देऊ शकतो.
एसबीआय कार्ड :
या कंपनीच्या शेअरने 800 रुपयांचा हाय गाठला होता. शेअर मार्केट मधील सातत्याने चालू असलेल्या पडझळीमुळे तो शेअर 800 वरून 690 पर्यंत पडलेला दिसून येतो. म्हणजेच जवळपास 12 ते 15 टक्क्यांची पडझड या शेअरमध्ये दिसून येते. गुंतवणूक सल्लागार रूचीर थत्ते हे आपल्याला मुहूर्त ट्रेनिंगला हा शेअर आवर्जून घ्यावा, असे सांगतात. या शेअरमध्ये जवळपास वर्षभर गुंतवणूक केल्यास आपल्याला 12 ते 15 टक्के परतावा मिळू शकतो.
शिला फोम :
देशभरात प्रसिद्ध असलेल्या स्लीपवेल मॅट्रेस हा ब्रँड असणाऱ्या शीला फोम कंपनीचा शेअरही गेल्या काही दिवसात 1035 पर्यंत उच्चांक गाठला होता. तो शेअर मार्केट मधील चालू असलेल्या पडझडीमुळे 1035 वरून वरून 800 रुपयांपर्यंत आला आहे. म्हणजे जवळपास 30% ची पडझड या शेअरमध्ये आपल्याला दिसून येते. हा शेअर गुंतवणूकदारांना घसघशीत असा 20 ते 25 टक्के परतावा देऊ शकतो.
इंडियन एनर्जी एक्सचेंज :
गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असणारा इंडियन एनर्जी एक्सचेंज हा देखील शेअर 240 च्या हायपासून 180 च्या आसपास आपल्याला ट्रेड करताना आता दिसत आहे, म्हणजे जवळपास 22 ते 25 टक्के पडझड या शेअरमध्ये दिसून आलेली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना तब्बल 40% परतावा देऊ शकतो.
आरती इंडस्ट्रीज :
हा शेअर देखील आपल्याला आत्ता खूप स्वस्तात उपलब्ध आहे. जवळपास 510 च्या आसपास हा शेअर असून स्पेशलिटी केमिकलमधील ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी अशी कंपनी आहे. त्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांची या शेअरवर नजर असते. येत्या काही दिवसात हा शेअर जवळपास 700 रूपयांपर्यंत उच्चांक गाठू शकतो.
दिवाळीच्या या मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळी मार्केटमध्ये झालेली पडझड आणि यामुळेच अनेक शेअर सध्याला खूप स्वस्त किमतीमध्ये उपलब्ध आहेत. म्हणून या मुहूर्त ट्रेडिंगला गुंतवणूकदारांनी याचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी.
स्टॉक एक्सचेंजच्या परिपत्रकातील वेळ
• प्री-ओपनिंग सत्र संध्याकाळी 5:45 ते 6:00 या वेळेत होईल.
• एक तासाच्या विशेष ट्रेडिंग सत्राची म्हणजेच मुहूर्त ट्रेडिंगची वेळ संध्याकाळी 6 ते 7 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
• ब्लॉक डील विंडो संध्याकाळी 5:30 ते 5:45 पर्यंत खुली असेल.
• पीरियोडिक कॉल ऑक्शनची वेळ संध्याकाळी 6:05 ते 6:50 पर्यंत असेल.
• बीएसईनुसार, ऑर्डर एंट्री सत्र शेवटच्या 10 मिनिटांत बंद होईल.
• क्लोजिंग सेशन संध्याकाळी 7 ते 7.10 पर्यंत असेल.
• पोस्ट क्लोजिंग संध्याकाळी 7.10 ते 7.20 पर्यंत असेल.
सूचना – इथे दिलेली माहिती तज्ज्ञ आणि एक्सपर्टशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे हे जोखिमेचं आहे. विशेषतः F&O सेगमेंटमध्ये ट्रेडिंग खूप जोखिमयुक्त असते. यामुळे इन्व्हेस्टमेंटपूर्वी एखाद्या सर्टिफाइड आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. संबंधित माहितीसाठी स्टार मनी जबाबदार असणार नाही