रत्ने आणि दागिने उद्योगाशी संबंधित असलेल्या स्काय गोल्डच्या शेअर्समध्ये माेठी वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता.२५) बीएसईवर स्काय गोल्डचा शेअर 3 टक्क्यांपेक्षा जास्त वाढून, 3687 रुपयांवर पोहोचला आहे.
कंपनीच्या शेअर्सने आता 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. स्काय गोल्ड आपल्या भागधारकांना बोनस शेअर्सची भेट देण्याची तयारी करत आहे.
दुसऱ्यांदा बोनस शेअर्सची तयारी
स्काय गोल्ड सध्या दुसऱ्यांदा बोनस शेअर्स देण्याचा विचार करत आहे. स्काय गोल्डने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शनिवार 26 ऑक्टोबर रोजी होत आहे. या बैठकीत भागधारकांना बोनस शेअर्स देण्याच्या प्रस्तावावर विचार करून त्याला मंजुरी दिली जाईल. स्काय गोल्डने याआधी सप्टेंबर 2022 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले हाेते. म्हणजेच कंपनीने प्रत्येक 1 शेअरमागे 1 बोनस शेअर दिला.
शेअर्समध्ये 3900 टक्के वाढ
स्काय गोल्ड शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या 5 वर्षांत 3970 टक्क्यापेक्षा जास्त परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स 6 नोव्हेंबर 2019 रोजी 90 रुपयांवर होते. तर 25 ऑक्टोबर 2024 रोजी शेअर्स 3687 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 2 वर्षांत स्काय गोल्डच्या शेअर्समध्ये 2300 टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 152 रुपयांवरून 3600 रुपयांपर्यंत वाढले आहेत.
गेल्या एका वर्षात स्काय गोल्डच्या शेअर्समध्ये 383 टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 3687 रुपये आहे. तर समभागांची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 680.35 रुपये आहे.
काय करते ही कंपनी?
स्काय गोल्ड लिमिटेड ज्वेलरी उत्पादनांचे उत्पादन आणि मार्केटिंग करते. कंपनी बांगड्या, कानातले, जेंट्स रिंग, डबल हुक पेंडेंट, कड आणि इतर उत्पादने विकते. स्काय गोल्ड आपली उत्पादने देशभरातील पाठवते.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)