4 वर्षात 1 लाखाचे झाले 76 लाख रुपये; ‘या’ इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअर्सचा 1 वर्षात हजार टक्के परतावा!
इलेक्ट्रिकल स्विच बनवणाऱ्या केयसी इंडस्ट्रीज या कंपनीचे शेअर्स त्यांच्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळवून देत आहेत.
शेअरची किंमत केवळ एका वर्षात 1072 टक्के आणि 3 महिन्यांत 160 टक्क्यांनी वाढली आहे. तर शेअर्स 4 वर्षात 57 रुपयांवरून, 4338.30 रुपयांवर गेला आहे. हा शेअर्स केयसी इंडस्ट्रीजचा आहे. केयसी इंडस्ट्रीज ही 75 वर्षांहून अधिक जुनी कंपनी आहे. सध्या ती साल्झर इलेक्ट्रॉनिक्सची उपकंपनी आहे. केयसी इंडस्ट्रीज ही रोटरी स्विचची पहिली भारतीय उत्पादक मानली जाते. कंपनीने 1942 मध्ये उत्पादन सुरू केले. काळाच्या ओघात कंपनीने बाजाराच्या गरजेनुसार नवीन उत्पादनेही विकसित केली आहेत.
7500 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा
बीएसईवर 22 ऑक्टोबर 2024 रोजी केयसी इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 4338.30 रुपयांवर आहे. 4 वर्षांपूर्वी 20 ऑक्टोबर 2020 रोजी शेअरची किंमत 57 रुपये होती. अशा प्रकारे गेल्या 4 वर्षात 7511 टक्के परतावा मिळाला. गुंतवणूकदाराने 4 वर्षांपूर्वी शेअर्समध्ये 10,000 रुपये गुंतवले असतील आणि अद्याप शेअर्स विकले नसतील, तर त्याची गुंतवणूक 7 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असती. त्याचप्रमाणे 50 हजार रुपयांची गुंतवणूक 38 लाख रुपये, 1 लाख रुपयांची गुंतवणूक 76 लाख रुपये आणि 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.
अल्ट्राफास्ट चार्जर्स स्टार्टअपमध्ये हिस्सा
कंपनीने 17 ऑक्टोबर रोजी शेअर बाजाराला सांगितले आहे की, त्यांनी अल्ट्राफास्ट चार्जर्स प्रायव्हेट लिमिटेडमधील 30 टक्के भागभांडवल खरेदी पूर्ण केले आहे. ही खरेदी आठ कोटी रुपयांना करण्यात आली होती. अल्ट्राफास्ट चार्जर्स हे बेंगळुरू-आधारित स्टार्टअप आहे जे इलेक्ट्रिक वाहनांसाठी हाय-एंड डीसी फास्ट चार्जिंग स्टेशन डिझाइन करते.
कंपनीचा नफा
बीएसईच्या आकडेवारीनुसार, एप्रिल-जून 2024 तिमाहीत कंपनीचा महसूल 12.61 कोटी रुपये होता. तर 1.50 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला गेला. प्रति शेअर कमाई 237 कोटी रुपये झाली. 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 48.81 कोटी रुपये होता आणि निव्वळ नफा 4.50 कोटी रुपये होता.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)