By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: आदित्य ठाकरे किती कोटींचे मालक? गाड्या किती आणि दागिने किती? वाचा सविस्तर
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > म्युच्युअल फंड > आदित्य ठाकरे किती कोटींचे मालक? गाड्या किती आणि दागिने किती? वाचा सविस्तर
म्युच्युअल फंडयशस्वी उद्योजक

आदित्य ठाकरे किती कोटींचे मालक? गाड्या किती आणि दागिने किती? वाचा सविस्तर

starmoney
Last updated: 2024/10/25 at 1:44 AM
starmoney Published October 25, 2024
Share
SHARE

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत. वरळीतून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना संपत्तींच प्रतिज्ञापत्र देखील निवडणूक आयोगाला सादर केलं आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, आदित्य ठाकरेंकडे 15 कोटींहून अधिकची चल संपत्ती आहे. तर 6 कोटी 4 लाख रुपयांची अचल संपत्ती आहे.

 

आदित्य ठाकरे यांनी त्यांचा व्यवसाय सामाजिक आणि राजकीय सेवा दिला आहे. उत्पन्नाचा स्त्रोत हा व्याज, भाडे, डिव्हिडंट आणि पगार असा केला आहे. मात्र ते नोकरी कुठे करतात याचा उल्लेख नाही. आदित्य ठाकरेंनी 43 लाखांचे कर्जही घेतल्याचेही प्रतज्ञापत्रात दाखवले आहे.

 

Aditya Thackeray

आदित्य ठाकरेंची संपत्ती

आदित्य ठाकरेंच्या बँकेतील रक्कम आणि ठेवी – 2 कोटी 81 लाख रुपये
हिंदू अविभक्त कुटुंबाचा भाग म्हणून असलेल्या बँक खात्यात 15 लाख 97 हजार रुपये
श्री अॅस्टर सिलिक्टेस लिमिटेड या डिलिस्टेड कंपनीचे 50 हजार शेअर असून ते 5 लाखांना घेतले होते ज्याची किंमत 30 सप्टेंबर 2024 रोजी 70 हजार रुपये झाली होती.
ICICI डीप डिस्काऊंट बॉण्ड – 5500 रुपयांना खरेदी, 30 सप्टेंबर 2024 रोजीची किंमत 50 हजार रुपये
म्युच्युअल फंडातील एकूण रक्कम 10 कोटी 13 लाख रुपये
म्युच्युअल फंड आणि शेअरमधील एकूण गुंतवणूक – 10 कोटी 14 लाख रुपये
हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक

GTL लिमिटेडचे दीड कोटी रुपयांचे 69 हजारांपेक्षा अधिक शेअर्स घेतले होते. या शेअर्सची आजची किंमत फक्त 8 लाख 93 हजार इतकी झाली आहे. 2003 साली या कुटुंबाने मारूती सुझुकी कंपनीचे 500 शेअर्स घेतले होते. शेअर्सची खरेदी किंमत 62 हजार रुपये इतकी होती, 20 वर्षांनंतर या शेअर्सची किंमत 66 लाख 14 हजार रुपये झाली आहे. ठाकरे कुटुंबाला म्युस कारा आणि सनग्रेस मफतलाल लिमिटेड कंपनीचे 57 हजार शेअर्स शून्य रुपयाला मिळाल्याचे दाखवण्यात आले आहे. या शेअर्सची किंमत 30 सप्टेंबर रोजी 57 हजार रुपये इतकी होती.

 

आदित्य ठाकरेंकडे दागिने किती?

आदित्य ठाकरेंकडे सोनं आणि हिऱ्याचं ब्रेसलेट आहे. ज्याची किंमत 3 लाख 90 हजार रुपये. या ब्रेसलेटमध्ये 535 हिरे आहेत. दोन हिरेजडीत सोन्याच्या बांगड्या आहेत ज्याची किंमत 47 लाख 42 हजार रुपये आहे. याशिवाय 24 कॅरेट सोन्याची 1 किलो 466 ग्रॅमची नाणी आणि बिस्किट आहेत. त्याची किंमत 1 कोटी 9 लाख 95 हजार आहे. याव्यतिरिक्त 239 ग्रॅमचा रत्नजडीत हार सुद्धा आदित्य ठाकरेंच्या मालकीचा आहे. त्याची किंमत 1 कोटी 33 लाख रुपये आहे. आदित्य ठाकरेंकडे असलेल्या एकूण सोने-चांदीच्या दागिन्यांची किंमत 1 कोटी 91 लाख रुपये दाखवण्यात आली आहे. हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून ठाकरे कुटुंबाकडे सोनं आणि चांदीचे सुमारे 84 लाख 3 हजाराचे दागिने आहेत.

 

आदित्य ठाकरेंनी कर्जत येथे 10 जानेवारी 2020 मध्ये एक जागा विकत घेतली होती. या जागेची किंमत नमूद करण्यात आलेली नाही. ही जागा आदित्य यांनी त्यांची आजी माधवी पाटणकर यांना 3 मार्च 2021 रोजी गिफ्ट डीडच्या माध्यमातून नावे केली. ही जमीन कर्जतच्या भिसेगांव इथे असून या जागेचे क्षेत्रफळ जवळपास 171 स्क्वेअर मीटर इतकी आहे. आदित्या ठाकरेंकडे एक बीएमडब्लू कार देखील आहे.

 

You Might Also Like

Smart Investment | 15x15x15 चा फॉर्मुला बनवेल कोट्याधीश, घरात पेशाची कमी होणार नाही, श्रीमंतांचं हे सूत्र फॉलो करा

IPO GMP | एकदम स्वस्त आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड फक्त 24 रुपये, मोठ्या कमाईची संधी

संवत्सर २०८१चे धमाक्यात स्वागत; मुहूर्त ट्रेडिंगवर लक्ष्मी प्रसन्न

Multibagger Stocks | शेअर प्राईस 19 रुपये, मालामाल करतोय हा शेअर, यापूर्वी दिला 2110% परतावा

उद्या आहे मुहूर्त ट्रेडिंग! कोणते स्टॉक ठरणार फायदेशीर?, तज्ञांनी सांगितली फायद्याची माहिती

starmoney October 25, 2024 October 25, 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
महाराष्ट्रराजकीय

वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवणार? वाद पेटलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा …

admin admin March 29, 2025
Can We Recreate Dinosaurs from Their DNA?
Hello world!
मोठी बातमी ! देवस्थान जमिनीच्या व्यवहारांना ब्रेक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नोंदणी विभागाला निर्देश …
बँक ऑफ महाराष्ट्राच्या नफ्यात 44 टक्क्यांनी वाढ, तिमाही निकालातून माहिती समोर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?