SBI Mutual Fund : बहुतांश व्यक्ती म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त लाभ मिळवत आहेत. अनेक व्यक्तींना शेअर मार्केटचा पुरेपूर अनुभव नसतो. त्याचबरोबर अनेकांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण रिस्क घ्यायची नसते.
कारण की शेअर मार्केटमध्ये परताव्याची कोणतीही गॅरंटी दिली जात नाही. त्यामुळे लोक म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणे सुरक्षिततेचे आणि फायद्याचे मानतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका एसबीआयच्या स्मॉल कॅप फंडबद्दल सांगणार आहोत.
एसबीआयच्या म्युच्युअल फंडचं नाव ‘एसबीआय स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ’ असं आहे. या फंडाने 5 वर्षांत मासिक 20,000 हजारांच्या गुंतवणुकीवर 28 लाख रुपयांचा नफा मिळवून दिला आहे. म्हणजेच या फंडाने एकूण पाच वर्षांत केलेल्या गुंतवणुकीवर दुपटीने फायदा मिळवून दिला आहे.
अशा पद्धतीने बनतील 20 हजारांचे 28 लाख रुपये :
या फंडात गुंतवणूकदारांना पाच वर्षांत 30% हून जास्त रिटर्न मिळालं आहे. यामधील एका वर्षाचे रिटर्न 37.29% एवढं असून 3 वर्षांचे 24.14% रिटर्न मिळालं आहे.
समजा एखाद्या व्यक्तीने या फंडमध्ये एकूण पाच वर्षांत प्रत्येक महिन्याला 20,000 हजार रुपये गुंतवले तर, 5 वर्षांत 12 लाख रुपयांची रक्कम जमा होते. पाच वर्षांच्या 30.35 रिटर्ननुसार व्याजाचे 16.18 लाख रुपये होतात. म्हणजेच एकूण 5 वर्षांत गुंतवणूकदाराची रक्कम 28.18 लाख रुपये एवढी होते. हे मिळणारे रिटर्न शंभर टक्क्यांहून अधिक जास्त आहे.
आणखीन कोण कोणते म्युच्युअल फंड चांगले रिटर्न देतात पाहूया :
केवळ एसबीआयच नाही तर आणखीन कंपन्यांनी देखील म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना चांगला रिटर्न मिळवून दिला आहे.
1) क्वांट फ्लेक्सि कॅप फंड : 25.44%
2) निप्पोन इंडिया स्मॉल कॅप फंड : 27 38%
3) क्वांट स्मॉल कॅप फंड : 28.97%
4) मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड : 25.46 %
5) क्वांट ईएलएसएस टॅक्स सेवर फंड : 26.21%
महत्त्वाचं :
बरेच म्युच्युअल फंड शेअर मार्केटबरोबर जोडलेले असतात. त्यामुळे यामध्ये पैसे गुंतवणे अनेकांना रिस्की वाटते. काही जाणकार व्यक्तींच्या सांगण्याप्रमाणे जो व्यक्ती शेअर मार्केटमधील चढताना घाबरतो त्यांनी म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर न घाबरता तुम्ही लॉन्ग टर्मसाठी देखील गुंतवणूक करू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही.