चालू आठवड्यात बाजाराने सलग चार दिवस गुंतवणूकदारांना हाबाडा दिला आहे. शुक्रवारी घसरणीनंतर बाजाराने कमबॅक केले.
बाजारातील चढ-उताराच्या या स्थितीत काही स्टॉक कमाल दाखवू शकतात. ते मोठी उसळी घेऊ शकतात. ब्रोकरेज हाऊस ॲक्सिस डायरेक्टने याविषयीचा अंदाज वर्तवला आहे. ब्रोकरेज हाऊस ॲक्सिस डायरेक्टने (Axis Direct) पोझिशनल ट्रेडर्ससाठी Samvardhana Motherson, AB Real Estate, Garden Reach, Bata India, Mazagon Dock हे पाच स्टॉक निवडले आहेत. ब्रोकरेज हाऊसनुसार येत्या 15 दिवसात हे स्टॉक कमाल दाखवतील. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
काय आहे ॲक्सिस डायरेक्टचा सल्ला
Samvardhana Motherson या स्टॉकवर Axis Direct ने भरवसा दाखवला आहे. ब्रोकरेज हाऊसने हा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. या शेअरचे लक्ष्य 218 तर स्टॉपलॉस 197 ठेवले आहे. 200- 203.50 रुपये दरम्यान तो खरेदीचा सल्ला दिला आहे. AB Real Estate हा स्टॉक खरेदीचा सल्ला Axis Direct ने दिला आहे. या शेअरची टार्गेट प्राईस 3,170 रुपये तर स्टॉपलॉस 2,820 रुपये ठेवण्यात आली आहे. 2,869- 2,898 रुपयांदरम्यान हा शेअर खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे.
काय दिलाय गार्डन रिचने सल्ला
Garden Reach हा शेअर खरेदीचा सल्ला देण्यता आला आहे. टार्गेट 1,939 रुपये, स्टॉपलॉस 1,720 रुपये देण्यात आला आहे. 1,745-1,765 या दरम्यान शेअर खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. Bata India हा शेअर खरेदीचा सल्ला ब्रोकिंग हाऊसने दिला आहे. त्याची टार्गेट प्राईस 1,509 रुपये तर स्टॉपलॉस 1,413 रुपये आहे. 1,423- 1,437 रुपया दरम्यान हा शेअर खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. Mazagon Dock शेअर खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. या शेअरची टार्गेट प्राईस 4,900 रुपये तर स्टॉपलॉस 4,305 रुपये ठेवण्यात आला आहे. 4,387- 4,432 या किंमतीवर हा स्टॉक खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)