भारतीय शेअर बाजारात कमालीची घसरण सुरु आहे. बीएसई निर्देशांक सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोन्हीना कोसळले आहेत. आज शेअर बाजार सुरवातीला वधारला मात्र काही मिनिटांतच कोसळला.
आज सेन्सेक्स हा 494.75 अंकानी घसरुन 81,006.61 वर थांबला आहे. तर निफ्टी 221.45 ने घसरुन 24,749.85 वर थांबला आहे. त्यामुळे आजही चांगलीच घसरण झाली आहे.
बाजाराच्या घसरणीचे नेमके कारण काय?
भारतातील शेअर बाजारात सततच्या होणाऱ्या घसरणीला कारणीभूत अनेक घटक आहेत. जागतिक संकेत आणि विदेशी गुंतवणूकदारांनी सुरु ठेवलेल्या विक्रीमुळे शेअर बाजारात प्रचंड पडझड होत आहे. मात्र सध्या या दोन्ही देशामध्ये तणाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. तेथे युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भितीचे वातावरण आहे. भारताचे इराण आणि इस्त्रायलशी चांगले व्यापारी संबंध आहेत त्यामुळे भारतातील शेअर बाजारातील गुंतवणूक काढून विदेशी गुंतवणूकदार हे सुरक्षित ठिकाणी गुंतवणूकीकडे वळत आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी चीन शेअर बाजारावर लक्ष केंद्रित केले आहे. चीनी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला सध्याच्या संकटामधून बाहेर काढण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज नुकतेच जाहिर केले होते. त्यामुळे तेथील शेअर बाजारामध्येही उत्साह संचारला होता. याच पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारही चीनचा पर्याय निवडत आहेत.
16 ऑक्टोबर रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) 3,436 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली, तर त्याच दिवशी स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2,256.29 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.
आजचे टॉप गेनर्स आणि टॉप लूजर्स शेअर्स
टॉप गेनर्स:इन्फोसिस , टेक महिंद्रा , पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया , लार्सन अँड टुब्रो स्टेट बँक ऑफ इंडिया इत्यादी.
टॉप लूजर्स- नेस्ले इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा , अल्ट्राटेक सिमेंट , बजाज फिनसर्व्ह , टायटन कंपनी इत्यादी .
मात्र सोन्याचा दरात प्रचंड वाढ
अशा पद्धतीने शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूक कमी होत असल्यास देशातील ही गुंतवणूकदार याचा विचार करत असून तेही शेअर बाजारातील गुंतवणूक कमी करत आहेत. देशातील गुंतवणूकदार हे गुंतवणूकीचे वेगवेगळे पारंपारिक पर्यायांकडे वळू शकतात. दिवसेंदिवस सोन्याचा दर वाढत चालला आहे. आणि भारतात सोन्यामध्ये गुंतवणूकीची परंपरा आहे. आणि नेमका सणासुदीचा काळ सुरु असल्याने सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे. सर्वसामान्यही याकाळात सोने खरेदीला जास्त महत्व देतात.